HW News Marathi
राजकारण

#Elections2019 : जाणून घ्या…नंदुरबार मतदारसंघाबाबत

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील सर्व मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत आहोत. लोकसभेमध्ये आपला प्रतिनिधी पाठवण्यासाठी आपण सर्वच मतदान करत असतो. मात्र ज्या नेत्याला पक्षाला आपण मत देतो त्याची माहिती करुन घेणेही महत्वाच असते. महाराष्ट्रातील मतदानाचे २ टप्पे पार पडले आहेत. तर आज (२३ एप्रिल) तिसरा टप्पा देखील पार पडत आहे. आता केवळ महाराष्ट्रातील चौथा आणि शेवटचा टप्पा शिल्लक आहे. हा शेवटचा टप्पा २९ एप्रिल रोजी पार पडेल.

आज आपण चौथ्या टप्यातील नंदुरबार मतदार संघाबाबत जाणून घेणार आहोत. नंदुरबार लोकसभा मतदार संघांतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात. ज्यामध्ये अक्कलकुआ, शहादा, नंदूरबार, नवापूर, साक्री आणि शिरपूर या मतदार संघांचा समावेश होतो.

उमेदवार कोण ?

नंदुरबार मतदार संघातून यावेळी भाजपकडून डॉ. हिना गावीत तर कॉंग्रेसकडून के.सी पडवी हे लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीचे सुशिल अंर्तुलिकर त्याचबरोबर इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण ११ उमेदवार नंदुरबारमधून लोकसभेच्या मैदानात उतरले आहे.

नंदुरबारमध्ये २०१४ ची स्थिती

नंदुरबारमधून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून डॉ. हीना गावीत तर कॉंग्रेसकडून माणिकराव गावीत उभे होते. त्यापैकी भाजपच्या हिना गावीत यांचा ५,७९,४८६ इतकी मतं मिळून विजय झाला होता. तर कॉंग्रेसच्या माणिकराव गावित यांना ४,७२,५८१ इतकी मतं मिळाली होती. त्यांच्या मतांचा फरक पहिला तर १,०६,९०५ इतक्या मतांनी भाजपच्या डॉ. हिना गावित यांचा विजय झाला होता. त्यांच्या मतांची टक्केवारी पहिली तर भाजपला ३४ % तर कॉंग्रेसला २८ % मतं मिळाली होती.

नंदुरबार मतदारसंघातील मतदारांची संख्या

नंदुरबार मतदारसंघात एकूण १८,५०,४४४ मतदार आहेत. या मतदारसंघात ९,१६,२१३ इतकी महिला मतदारांची संख्या आहे तर ९,३४,२०९ इतकी पुरुष मतदारांची संख्या आहे.

नंदुरबार मतदारसंघाचा इतिहास

नंदुरबारचा इतिहास पहिला तर नंदुरबार हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. मात्र २०१४ मध्ये हा बालेकिल्ला सुद्धा मोदी लाटेत वाहून गेला. येथून हिना गावित विजयी झाल्या.

तर येथील विधानसभा मतदारसंघाची स्थिती पाहिल्यास येथील ४ ठिकाणी कॉंग्रेसची सत्ता आहे तर दोन ठिकाणी भाजपची सत्ता आहे. नंदुरबार हा आदिवासी बहूल प्रदेश आहे. या ठिकाणी नेहमी आदिवासी लोकांचा प्रभाव राहिला आहे. तर मराठा समाजाचीही संख्या येथे मोठ्या प्रमाणात आहे. तसेच नंदुरबार हा कॉंग्रेससाठी नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे.

कॉंग्रेसने नेहमी आपल्या प्रचाराची सुरुवात नंदुरबारमधून केली आहे. यावेळी काँग्रेसकडून सलग ६ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले ज्येष्ठ नेते केसी पाडवी येथून मैदानात उतरले आहेत. उच्चशिक्षण, सर्वसमावेशक वागणूक आणि सर्व स्तरावरील कार्यकर्त्यांना न्याय देण्याची धमक ही त्यांची जमेची बाजू असल्याचे बोलले जाते. तर त्यांच्या विरोधात भाजपच्या डॉ. हिना गावित उभ्या आहे. पेशाने डॉक्टर असणाऱ्या गावित या १६ व्या लोकसभेमधील सर्वात तरूण खासदार आहेत.

नवापूर पालिकेची जबाबदारी तर खुद्द खासदार डॉ. हीना गावित यांच्यावर असताना याठिकाणी एकही जागा भाजपच्या हाती लागली नाही. मात्र अंतर्गत कलह हा देखील भाजपसमोरचा आव्हानाचा मुद्दा आहे. हा परीसर दुर्गम असून या भागात अजूनही रस्ते, दूरसंचार, आरोग्य, शिक्षण, रोजगार, सिंचन, कुपोषण या मुख्य समस्या आहेत. यंदा कॉंग्रेस आपला हा गड पुन्हा खेचून आणते की परत भाजपचीच सत्ता कायम राहते हे पाहणे महत्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार यांचे सामनाच्या अग्रलेखाला प्रत्युत्तर

News Desk

अजित पवार अन् शरद पवार आज बारामतीत, कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी होणार चर्चा?

swarit

भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार? 

News Desk