मुंबई | अयोद्धा राम मंदिर प्रकरणावरून शनिवारी संजय राऊत यांनी काँग्रेस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. “अशोक चव्हाण आणि कॉंग्रेस हे राम मंदिर प्रकरण सोडवू शकत नाहीत, याची मला खात्री आहे”, असे संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्याला अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “आपला देश संविधानानुसारच कार्य करतो. राम मंदिर प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे संपूर्ण देश पालन करेल”, असे अशोक चव्हाण म्हणाले.
Our country functions on the basis of the Constitution. Whatever decision will be taken by courts will be followed by the entire nation: Ashok Chavan, Congress, on Sanjay Raut’s statement, ‘Court cannot solve Ram Temple issue, it's a matter of faith.’(20.10.2018) pic.twitter.com/aRIuReCpNX
— ANI (@ANI) October 20, 2018
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग आल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी शनिवारी (२० ऑक्टोबर) बैठक झाली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमची चर्चा सुरू असून जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
शनिवारी (20 ऑक्टोबर) मध्यरात्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते.
काय म्हणाले अशोक चव्हाण ?
“उद्धव ठाकरे दर दिवशी नवनवीन विधाने करत आहेत. अयोध्या राम मंदिर प्रकरणासंदर्भात शिवसेना कधीही गंभीर नव्हती. परंतु निवडणुका जवळ येत असल्याने त्यांच्याकडून वारंवार अयोध्या प्रकरणाचा उल्लेख केला जात आहे,” अशी टीका अशोक चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.