HW News Marathi
राजकारण

छत्रपतींच्या वेशात, महाराष्ट्राची कैफियत

मुंबई | विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आरक्षण, शेतकरी-आदिवासी मोर्चा, दुष्काळ, शिवस्मारक, कर्जमाफी या मुद्द्यांनी गाजत आहे. या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभियेंनी विधानभवनाच्या आवारात अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. डोक्यावर जिरे टोप, गळ्यात माळा, कपाळावर टिळा आणि भगव्या रंगांच्या छत्रपती शिवाजी महाराजांसारख्यी वेशभूषा परिधान करून आमदार प्रकाश गजभिये यांनी विधानभवनाच्या आवारात प्रवेश केला. विधानभवनाच्या गजभिये यांच्या या वेशभूषाने ते सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवाजी महाराजांच्या पोशाखात येऊन “बेमूर्वतखोर सत्ताधाऱ्यांना चालते व्हा“, असा आदेश त्यांनी दिला आहे.

आरक्षण, शिवस्मारक, कर्जमाफीच्या पोकळ आश्वासनांशिवाय जनतेला काही मिळाले नाही ही कैफियत त्यांनी मांडली. शिवस्मारकाच्या नावाने सरकार तोंडाला पाने पुसतेय, पानभर जाहिराती तरी आत्महत्या का.? महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आंधळा, पांगळा, लुळा होत आहे. राज्यात कोणालाच न्याय मिळत नाहीय. म्हणूनच त्या लोकांना न्याय देण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषामध्ये मी आलेलो असल्याचे आमदार गजभिये अधोरेखित केले. आरक्षणावर सभागृहात नुसत्या चर्चा होतात. आश्वासने दिली जातात मात्र होत काहीच नाही अशी खंतही गजभिये यांनी व्यक्त केली. हे सगळं पाहून सरकारने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असाच प्रश्न मला पडत असल्याचे गजभिये म्हणाले.

यापूर्वी नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात ‘आंबा खाऊन अपत्य होण्याच्या वादग्रस्त विधानाचा निषेध’ करण्यासाठी शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडेच्या वेशात आले होते. इतकचं नाही तर विधानभवनात घेऊन आलेल्या आंब्यांवर ‘संभाजी भिडे यांच्या शेतातील आंबे’ असंही लिहिलेलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : पार्थ, सुजयच्या पाठोपाठ आता आदित्य ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात ?

News Desk

…कारण ५६ इंचाची छाती असणारा चौकीदार चोर आहे !

News Desk

महिला व बालविकास मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करा !

News Desk