HW News Marathi
राजकारण

हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कन्नडचे अपक्ष आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उद्धव ठाकरेंवर केलेल्या टोकाच्या टीकेमुळे हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात कन्नड पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार हर्षवर्धन जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंबद्दल खालच्या स्तरावर टीका केल्यानंतर येथील शिवसैनिकांमध्ये हर्षवर्धन जाधव यांच्याबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.

हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध शिवसैनिकांकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत शिवीगाळ करणे, जातीय भावना भडकविणे, त्याचप्रमाणे शिवसैनिकांच्या भावना दुखावणे आरोप करण्यात आला आहे. उमेदवारी न मिळाल्याने हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेमध्ये जोरदार टीका केली होती. याच टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे सिल्लोडचे उमेदवार अब्दुल सत्तर यांचे नाव घेत हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह टीका केली.

हर्षवर्धन जाधव यांच्या आक्षेपार्ह टीकेनंतर बुधवारी (१६ ऑक्टोबर) रात्री दोनच्या सुमारास त्यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला झाला. हा अज्ञाताच्या हल्ल्यात त्यांच्या घरावर जोरदार दगडफेक करण्यात आली. तसेच जाधव यांच्या गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जाधव यांची जीभ घसरली होती. त्याच पार्श्वभूमीवर आपल्या घरावर झालेला हल्ला हा शिवसैनिकांनी केल्याचा आरोपही हर्षवर्धन जाधव यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खड्ड्यांवरुन मनसे पुन्हा एकदा आक्रमक, मंत्रालयासमोर मध्यरात्री खोदला रस्ता

News Desk

अनेक वर्षे मतभिन्नता होती, आजही आहे, उद्याही असू शकेल !

News Desk

पुलवामा हल्ल्यानंतरचे ४ तास पंतप्रधान फिरत होते, काँग्रेसचा आरोप

News Desk