HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

निवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आंबेडकरांविरोधात गुन्हा

दिग्रस (यवतमाळ) | वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेडकर यांच्याविरुद्ध यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये गुन्हा नोंदविल्या माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.वंचित बहुजन आघाडीची बुधवारी (३ एप्रिल) सायंकाळी दिग्रसमध्ये सभा पार पडली. या सभेतील भाषणात आंबेडकरांनी म्हटले की, “आम्ही सत्तेत आलो तर निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू” असे विधान केले होते.

निवडणूक आयोग प्रचारात पुलवामा हल्ला, सर्जिकल स्ट्राईक याचा उल्लेख करण्यास मनाई करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी हे विधान केले होते. निवडणूक आयोगाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य बद्दल त्यांच्याविरुद्ध दिग्रस पोलिसात भादंवि ५०३, ५०६, १८९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

 

Related posts

मध्य प्रदेशात मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड, काँग्रेस नेत्यांकडून तक्रार

News Desk

अशोक चव्हाण २ मे रोजी नाणारच्या दौ-यावर

News Desk

मोदींनी ‘आयएनएस विराट’प्रकरणी राजीव गांधींवर केलेले आरोप पूर्णपणे खोटे !

News Desk