HW News Marathi
राजकारण

आजपासून शरद पवार ३ दिवसांच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता राज्यात खऱ्या अर्थाने प्रचार रंगात आला. सर्वच पक्ष आपल्या संपूर्ण ताकदीनिशी प्रचाराला लागले आहेत. विविध दौरे, सभांद्वारे सर्वच राजकीय पक्ष सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, एकीकडे भाजपच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान मोदी राज्यात ९ जाहीर सभा घेण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा राज्यात ३ दिवसांच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर असणार आहेत. आजपासून (८ ऑक्टोबर) म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर शरद पवार यांच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

शरद पवार आज (८ ऑक्टोबर) अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये सकाळी ११.३० वाजता, पारोळ्यात सायं. ५ वाजता, तर बुधवारी (९ ऑक्टोबर) विदर्भात अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे सकाळी ११.३० वाजता, वाशिम जिल्ह्यातील मानोरा-कारंजा येथे सायंकाळी ४ वाजता सभा घेतली. तर आपल्या दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच १० ऑक्टोबरला शरद पवार सकाळी १०.३० वाजता हिंगणघाट, दुपारी ३ वाजता बुटीबोरी-हिंगणा, तर सायं. ५ वाजता काटोल येथे जाहीर सभा घेणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरिटी दिली होती – शरद पवार

News Desk

“एकनाथ शिंदेंनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला…,” नारायण राणेंचे सूचक वक्तव्य

Aprna

दोस्ती ग्रुपसोबत बीएमसीची खास दोस्ती – संजय निरुपम 

News Desk