मुंबई । “अवनीच्या अतिशय क्रूरपणे करण्यात आलेल्या हत्येमुळे मला दुःख झालं आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी ठार करण्याचे आदेश दिले आहेत. मुनंगटीवार यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या वाघाच्या शिकारीपैकी ही तिसरी शिकार आहे. वाघिणीला बेशुद्घ करुन पकडणं शक्य होतं, मात्र तिला ठार करण्यात आलं. त्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शार्प शूटरची नियुक्ती करण्यात आली, असा आरोप केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी त्यांचा अधिकृत ट्विट करून केला आहे.
I am deeply saddened by the way tigress Avni has been brutally murdered in #Yavatmal, #Maharashtra. #Justice4TigressAvni https://t.co/hX6wuf62Ec
— Maneka Sanjay Gandhi (@Manekagandhibjp) November 4, 2018
मेनका गांधी यांच्या या वक्तव्यामुळे सुधीर मुनगंटीवार अडचणीत आले आहेत. आपण याबाबत कायदेशीर आणि राजकीय कारवाईबाबत विचार करत असल्याचेही मनेका गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.आपण हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहोत. तसेच मुनगंटीवारांच्या आदेशाविरोधात कायदेशीर तसेच राजकीय लढाई लढणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सुधीर मुनगंटीवार यांचे उत्तर
‘वाघिणीला ठार करण्याचा निर्णय मंत्री किंवा सचिव घेत नाही. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शिकेनुसार निर्णय घेतला’, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. वाघिणीच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांचाही विचार करावा लागतो, अशा शब्दांत त्यांनी मनेका गांधी यांना टोला लगावला.
”अवनी’ वाघिणीला बेशुद्ध करून जिवंत पकडण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने वन कर्मचा-यांचा जीव वाचविण्यासाठी नाईलाजाने तिला ठार मारावे लागले. मंत्री आणि सचिव मुंबईत मंत्रालयात बसून वनांचे आणि वन्यजीवांचे रक्षण करत नाहीत. ते शेतकरी व अदिवासी करतात. त्यांच्यामध्ये खूप असंतोष होता. तो दूर केला नसता तर अखेरीस हेच लोक वन्यजीवांचे शत्रू झाले असते,’असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.