अमृतसर | “पाकिस्तानच्या सेना प्रमुख कमर बाजवा यांना ठणकावून सांगू इच्छितो की, आम्ही पंजाबी आहोत, पाकला पंजाबच्या हद्दी प्रवेश करू देणार नाही,” असा धमकी वजा इशारा, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिला आहे. डेरा बाबा नानक- करतारपूर साहिब कॉरिडॉरच्या भूमिपूजन सोहळ्यात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवा यांना फटकारले आहे.
#WATCH I am warning you(Pakistan Army Chief Qamar Bajwa), we are also Punjabis, you will not be allowed to enter here and vitiate the atmosphere: Punjab Chief Minister Captain Amarinder Singh pic.twitter.com/ACk82SYHRg
— ANI (@ANI) November 26, 2018
पुढे सिंग असे देखील म्हणाले की, “मी सुद्धा एक जवान आहे, हे त्यांनी विसरू नये. पाकिस्तानचे सेना प्रमुख बाजवा मला खूप ज्युनिअर आहेत. मी मुशर्रफ यांनाही सीनिअर आहे. प्रत्येक जवानाला माहीत असते की, दुसरा जवान काय विचार करतो. आम्ही नेहमीच देशाचे संरक्षण करू इच्छितो. परंतु तुम्हाला हे कोणी शिकवले की लोकांची हत्या करा, अमृतसरचे लोक कीर्तन करत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानी ग्रेनेडने हल्ले करत आहेत, असे म्हणत पाकच्या लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.
I would like to ask Pakistan Army Chief Qamar Bajwa something, as a soldier. Which Army teaches to violate ceasefire and kill jawans on the other side? Which Army teaches to send ppl to attack Pathankot and Amritsar? This is cowardness: Punjab CM Capt Amarinder Singh pic.twitter.com/mwtDvrRVqm
— ANI (@ANI) November 26, 2018
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी डेरा बाबा नानक- करतारपूर साहिब कॉरिडोरची पायाभरणी केली आहे. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांवर निशाणा साधला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.