HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मी हेमंत करकरे यांना म्हटले होते की त्यांचा सर्वनाश होईल !

मुंबई | मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोप साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याविषयी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “हेमंत करकरे यांनी मला खोट्या प्रकरणात फसविले. मी हेमंत करकरे यांना म्हटले होते कि तुमचा सर्वनाश होईल आणि त्यांना दहशतवाद्यांनी मारले”, असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने केले आहे. साध्वी प्रज्ञा यांच्या या वक्तव्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

“मला रोखण्यासाठी षडयंत्र रचले गेले होते. मला ९ वर्षांपर्यंत तुरुंगात ठेवले गेले. त्यामुळे मी २० वर्षे मागे गेले”, असेही साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी साध्वी प्रज्ञा सिंह यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील जाहीर केली आहे. साध्वी प्रज्ञा या भोपाळ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात लढणार आहेत.

Related posts

अर्थमंत्र्यांनी लेखानुदान मांडताना अनेक वायदे आणि वादे केले !

News Desk

लोकसभेसाठी राष्ट्रवादीची जाहिरनामा समिती जाहीर

News Desk

माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे | राम कदम

News Desk