HW News Marathi
राजकारण

मी २३ मे रोजी गुलाल उधळायला बारामतीत जाणार !

मुंबई | “राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीबाबत राज्य सरकार गंभीर आहे. आम्ही त्यावर उपाययोजना करीत आहोत. पण जाणत्या राजाला ते दिसत नाही. हेच सांगायला आणि गुलाल उधळायला २३ मे रोजी मी बारामतीत जाणार आहे”, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. “आमचे सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठिशी उभे आहे”, असे आश्वासनही चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

“दुष्काळाविषयी सरकारला बोल लावण्यापेक्षा त्यांनी १-२ ठिकाणी चारा छावण्या सुरू केल्या तर बरे होईल. चांगल्या उपाययोजना असतानाही शरद पवारांसारखे नेते म्हणतात दुष्काळग्रस्त भागात चर्या छावण्या नाहीत, टँकर नाहीत. येत्या २३ मे रोजी मी त्यांना सांगायला आणि गुलाल उधळायला बारामतीत जाणार आहे”, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बिघडलंय तर इंजिन आणि बदलले डबे..!”, मोदींच्या मंत्रिमंडळावरून महाविकासआघाडीची टीका

News Desk

यंदा आमचा विजय निश्चित !

News Desk

अग्निशमन केंद्राच्या जागेवर सहकारमंत्र्यांचा बंगला

News Desk