HW News Marathi
राजकारण

भाजपला बारामतीत विजय मिळाल्यास मी राजकारणातून निवृत्ती घेईन !

पुणे | “भाजपला बारामतीत विजय मिळाल्यास मी राजकारणातून निवृत्ती घेईन”, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे. त्याचप्रमाणे, जर बारामतीत भाजपचा पराभव झाला तर भाजपने राजकारण सोडून द्यावे”, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी आज (२३ एप्रिल) आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर बारामतीतून राष्ट्रवादीच विजयी होईल, असा विश्वास दर्शविला आहे.

“ज्यावेळी मी आमदारकीसाठी उभा राहिलो त्यावेळी मोदींनी बारामतीत घेतलेल्या सभेत जवळ-जवळ पाऊणलाख लोक उपस्थित होती. असे असूनही मी १ लाख मतांनी निवडून आलो”, याची आठवण देखील अजित पवार यांनी यावेळी करून दिली. “भाजप जर बारामतीत जिंकली तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन. पण जर भाजपचा पराभव झाला तर भाजपने राजकारण सोडून द्यावे”, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भगवान हनुमान हे दलित नाही, ते तर आदिवासी होते !

News Desk

‘वर्षा’ निवासस्थानी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुकेश अंबानींची भेट; राज्यात चर्चेला उधाण

Aprna

विधानसभेला युती निश्चित, लवकरच होणार अधिकृत घोषणा

Gauri Tilekar