HW News Marathi
राजकारण

‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे आणि गौतम अदानी यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई | राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवसेनेच्या गटप्रुमखांना संबोधित करणार आहेत. उद्धव ठाकरे हे आज (21 सप्टेंबर) मुंबईतील नेक्सो मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत. या सभेपूर्वीच उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात आज तासभर चर्चा झाल्याची माहिती माध्यमातून येत आहे. या अदानी आणि ठाकरेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, अदानी आणि ठाकरेंनी मातोश्रीमध्ये या दोघांमध्ये भेट झाल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईत उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. मुख्यमंत्री दिल्लीतून मोठी घोषणा करणार असल्याची चर्चा माध्यमातून मिळाली आहे. या पत्रकार परिषदेत शिंदेसोबत महत्वाचे नेते उपस्थित असणार आहेत.

शिवसेनेच्या सभेत 22 हजार खुर्च्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात लावण्यात आल्या असून जवळपास 400 बसेस सभेसाठी येणार आहेत. तर मुंबईमधील जवळपास 227 शिवसेनेच्या शाखा असल्याने सभेसाठी मोठ्या प्रमाणात गटप्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींनी लोकांना देशभक्तीची सर्टिफिकेट वाटू नये !

News Desk

अजित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरे आघाडीत सामील होणार ?

News Desk

#LokSabhaElections2019 : पार्थ, सुजयच्या पाठोपाठ आता आदित्य ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात ?

News Desk