HW News Marathi
राजकारण

शिवसेनेच्या गटप्रमुख मेळाव्याच्या स्टेजवर संजय राऊतांसाठी खुर्ची आरक्षित

मुंबई | राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे आज गटप्रमुखांचा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. हा मेळावा  शिवसेनेच्या गटप्रमुखांचा आज मेळावा सुरू आहे. हा मेळावा मुंबईतील नेस्को मैदानात सुरू आहे. या मेळाव्याच्या स्टेशवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासाठी एक खुर्ची आरक्षित ठेवण्यात आली आहे. यावरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे राऊतांच्या पाठीशी उभे असल्याचा संदेश दिला.

दरम्यान, पत्राचाळ घोटाळाप्रकरणी (Patra Chawl Case) राऊतांवर ईडीने कारवाई केली आहे. राऊत हे सध्या आर्थर रोड कारागृहातील मुक्कामी आहेत. राऊतांना मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा 4 ऑगक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवली आहे.

शिवसेनेच्या सभेत 22 हजार खुर्च्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात लावण्यात आल्या असून जवळपास 400 बसेस सभेसाठी येणार आहेत. तर मुंबईमधील जवळपास 227 शिवसेनेच्या शाखा असल्याने सभेसाठी मोठ्या प्रमाणात गटप्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता ‘त्यांना’ स्वतःला भाजपमध्ये जाण्याचा अनुभव घ्यायचा असेल !

News Desk

स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश देत, मोदींच्या दिवाळी शुभेच्छा!

News Desk

पवारांनी मुंडेंचे घर फोडले, जयदत्त क्षीरसागर यांचा गंभीर आरोप

News Desk