HW News Marathi
राजकारण

शरद पवार यांना पाचव्या रांगेत स्थान देणे अत्यंत अपमानकारक !

नवी दिल्ली | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांच्या नव्या मंत्रिमंडळातील एकूण ५८ जणांनी गुरुवारी (३० मे) मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी देशासह परदेशातील जवळपास ८,००० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, या सोहळ्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अपमान केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. याचे कारण असे कि भाजपकडून या सोहळ्यासाठी शरद पवार यांना थेट पाचव्या रांगेचा पास देण्यात आला.

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार हे सभागृहात एक राष्ट्रीय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. शरद पवार यांना या सोहळ्यात पाचव्या रांगेत स्थान देण्यात आले. हे अत्यंत अपमानकारक आहे. शरद पवार यांना पाचव्या रांगेत स्थान देणे अत्यंत क्लेशदायक आहे”, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती भवनात गुरुवारी पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात शरद पवार यांना पाचव्या रांगेत जागा देण्यात आली. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीए अध्यक्ष सोनिया गांधी, आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. याच कारणास्तव शरद पवार हे मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाड में गया कानून और भाड में गयी आचारसंहिता, राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य

News Desk

शिशीर शिंदेंचा शिवसेनेत प्रवेश

News Desk

#ElectionsResultsWithHW : देशातील प्रतिष्ठेच्या लढती

News Desk