HW News Marathi
राजकारण

ती माझीच क्लीप | मुख्यमंत्री

वसई | पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आतापर्यंतचा सर्वात गंभीरआरोप शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. पालघरमध्ये शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या भरसभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप जगजाहीर केली. हे संभाषण मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता. परंतु शनिवारी या संदर्भात बोलताना ती क्लिप आपलीच असल्याचे मुख्यमंत्री म्हणालेत.

पराभव समोर दिसत असल्यामुळे शिवसेना खालच्या पातळीवर जाऊन अशा प्रकारचे कृत्य करत आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी शिवसेनेनेमाझी ऑडिओ क्लिप एडीट करुन भर सभेत सादर केली. ही संपूर्ण ऑडिओ क्लिप १४ मिनिटांची आहे. मी स्वत: ती क्लिप निवडणूक आयोगाकडेदेणार असल्याचे वसई येथील एका सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेनेने उत्तर प्रदेशासाठी जाहीर केली ५ उमेदवारांची यादी

News Desk

‘युती झाली नाही तरीही लोकसभेला भाजपसोबत’

News Desk

कोकणातून नाणारचा राक्षस घालवल्याबद्दल उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

News Desk
शिक्षण

विना अनुदानित दिव्यांग शाळांच्या शिक्षकांचे आमरण उपोषण

News Desk

मुंबई | विना अनुदानित दिव्यांग निवासी शाळा आणि अनिवासी शाळा यांना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात यावे. यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग कायम विना अनुदानित विशेष शाळा व कर्मशाळासंघटनेच्या वतीने आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू आहे. या आमरण उपोषणात महाराष्ट्रातील सर्व विना अनुदानित दिव्यांग निवासी व अनिवासी शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि कर्मचारी वर्गसहभागी झाले आहेत.

दिव्यांग मुले, मुली शिक्षणापासून वंचित राहू नये. त्याकरिता महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थे अंतर्गत शिक्षणाची व निवासाची व्यवस्था केलेली आहे. या दिव्यांग मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या शांळांनाज्या सोयी सुविधा राज्य सरकारकडून मिळणे अपेक्षित होते. अनुदान नसल्यामुळे सोयी सुविधा मिळत नाही. त्यामुळे सरकारने या शाळांच्या अनुदानाच्या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाअधिकारी यांच्या माध्यमातून २०१६ पासून विना अनुदानित दिव्यांग शाळेची तपासणीकरण्यात येते. या तपासणीनंतर जिल्ह्यातील आयुक्त, अपंग, कल्याणआयुक्तालय आणि पुणे यांच्याकडे देखील पाठविण्यातआले. यानंतर महाराष्ट्रातील ‘अ’ श्रेणीची यादी व तपासणी प्रस्ताव सामाजिक न्याय विभाग मंत्रालय, महाराष्ट्र शासन मुंबई येथे पाठविले जाते.परंतुआजपर्यंत या प्रस्तावावर कोणत्याही प्रकारचा शासकीय निर्णय झालेला नाही.

त्या विरोधात संघटनेच्या वतीने वेळोवेळी धरणे आंदोलन, मोर्चा आणि उपोषण करुन सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केलागेला. परंतु याकडे या विना अनुदानित दिव्यांग शाळांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्षकरत असल्याचे चित्र दिसत आहे. या विना अनुदानित दिव्यांग निवासी शाळा गेल्या १० ते १५ वर्षापासून संस्थेच्या वतीने सर्व मुलांचे शिक्षण व पालन पोषणाचा सर्व खर्च केला जातो. त्यामुळे या संस्थांवर कर्जझाले असून पुढील खर्चासाठी सरकारी अनुदानाची गरज आहे.

राज्य सरकार विना अनुदानित दिव्यांग शाळांना अनुदान देण्याबाबत उदासीन असून सरकारने फक्त अपंग हा शब्द बदलूनदिव्यांग परंतु सरकाराने दिव्यांग शब्द देण्याव्यतिरिक्त काही केले नसल्याचाआरोप संघटनेच्या खजिनदार शिल्पा रावल यांनी केला आहे.

Related posts

ठाणे महानगरपालिकेत अधिष्ठाता पदाची जागा

News Desk

“गडकिल्ले व पर्यावरण संवर्धन” कार्यक्रमाचे आयोजन

News Desk

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शुल्कामुळे  प्रवेश व परीक्षेपासून वंचित ठेवू नये

News Desk