नवी दिल्ली | देशातील प्रसिद्ध हेअरस्टाईल डिझायनर जावेद हबीब यांनी काल (२३ एप्रिल) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हबीबच्या प्रवेशानंतर सोशल मीडियावर मेम्स व्हायरल होत आहेत. या मेम्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या हेअर स्टाईल बदलल्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
हबीब यांच्या भाजप प्रवेशानंतर ट्रोलिंगसाठी नेटीझन्सला चांगलाच विषय मिळाला आहे. अनेक क्रिएटर नेटीझन्सने नवीन हेअर स्टाईलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्यातूनच, नरेंद्र मोदी, अमित, शहा, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांसह अनेक राजकीय नेत्यांची हेअरस्टाईल बददली. तर, भाजपाविरोधी नेते अन् कलाकांराना जावेद यांच्या सलूनमधून बायकॉट केल्यानंतरचे चित्रही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हबीबच्या प्रवेशानंतर सोशल मीडियावर आधी मी फक्त केसांचा चौकीदार होतो. आता देशाचा चौकीदार झालो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. हबीब यांच्या या फोटोमध्ये त्यांच्या गळ्यात कमळाचे निशाण असलेले उपरणे आणि मागे भाजपचे बॅनर दिसत आहेत.
जावेद हबीब यांचा अल्प परिचय
जावेद यांना हेअरस्टाईलचा वारसा त्यांच्या आजोबाकडून मिळाला आहे. त्यांचे आजोबा लॉर्ड माउंटबॅटन यांच्यासह अनेक दिग्गजांचे हेअरकट करत होते. यानंतर त्याचे वडील पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींची हेअरस्टाइल करत. गांधी-नेहरू घराण्याशी त्यांच्या घराण्याचे असे जवळचे नाते असतानाही हबीब यांनी मात्र भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जावेद हबीब यांचे २४ राज्यांमध्ये, ११० शहरांमध्ये ८४६ सलून आहेत. जवळजवळ १५ लाख नागरिक या सलूनची ग्राहक आहे. नुकतेच त्यांनी लिहिलेले ‘हेअर योगा’ हे पुस्तक प्रकाशित झाले. केसांची काळजी कशी घ्यावी याबद्दल त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.