नवी दिल्ली | भाजपसोबत असलेली आघाडी केवळ बिहारपुरतीच मर्यादित ठेऊन बिहारबाहेर स्वबळावर लढण्याचा मोठा निर्णय जेडीयूने घेतला आहे. जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. रविवारी (९ जून) पाटणा येथे पार पडलेल्या जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए सरकारने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. देशभरात एनडीएने मिळवलेल्या या ऐतिहासिक यशात त्यांच्या मित्र पक्षांचाही वाटा मोठा आहे. मात्र, भाजपकडून जेडीयूला मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात एकही मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यामुळे, जेडीयूमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत होता.
Janata Dal United (JDU) will not be a part of National Democratic Alliance (NDA) outside the state of Bihar. JDU will fight the upcoming elections alone in J&K, Jharkhand, Haryana & Delhi. The decision has been taken in the party's National Executive Meet today. pic.twitter.com/LfwMgZs2l3
— ANI (@ANI) June 9, 2019
जेडीयूची भाजपसोबत असलेली आघाडी ही केवळ बिहारपुरती मर्यादित ठेऊन बिहारबाहेर स्वबळावर लढण्याचा निर्णय जेडीयूकडून घेण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, झारखंड, हरियाणा, दिल्ली इत्यादी राज्यात येत्या वर्षभराच्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये जेडीयू स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा जेडीयूकडून करण्यात आली आहे. जेडीयू एनडीएमधून बाहेर पडेल अशी चर्चा गेले अनेक दिवस राजकीय वर्तुळात रंगत होती. मोदींच्या मंत्रिमंडळात जेडीयूला एकही मंत्रिपद न दिल्याने जेडीयूमध्ये नाराजी होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.