मुंबई | सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना ऍट्रॉसीटी कायद्याला कमजोर करणारा निर्णय देणारे न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल हे नुकतेच ६ जुलै रोजी निवृत्त झाले. त्यानंतर लगेच त्यांची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या ( एन.जी.टी ) च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेत ऍट्रॉसीटी कायद्याला कमजोर करणारा निर्णय देऊन देशभरातील दलितांचा रोष असलेल्या न्यायमूर्तीला निवृत्तीनंतरही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदाची महत्वपूर्ण जबाबदारी कशी दिली जाते असा सवाल करीत या पदावरून न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांना त्वरित हटवावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
ऍट्रॉसिटी कायद्याला कमजोर करणारा निर्णय देणाऱ्या न्यायमूर्ती आदर्शकुमार गोयल यांची राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्याने देशभरातील आंबेडकरी जनतेत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून न्या. गोयल यांच्याविरुद्ध देशात आंबेडकरी जनतेत नाराजी असल्याने त्यांना त्वरीत राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या अध्यक्षपदावरून हटवावे अशी मागणी आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.
Justice Goyal had given wrong judgment on SC/ST Atrocities act. I don't think it is appropriate to appoint him as NGT chairman. I am a part of NDA, but I demand that he should be removed from that post. He has hurt feelings of Dalits: Ramdas Athawale, Union Minister pic.twitter.com/7Hym2i7n5U
— ANI (@ANI) July 28, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.