HW News Marathi
राजकारण

 कन्हैय्या कुमारसह १० जणांवर आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली | दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) देशविरोधी घोषणा दिलेल्या प्रकरणाचा विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमारसह १० जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. २०१६ साली दाखल करण्यात आलेल्या देशद्रोहाच्या खटल्यांतर्गत आरोप करण्यात आले आहेत. सीबीआयच्या स्पेशल सेलने दिल्लीतील पटिलाया हाऊस कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. कोर्टाने उद्या (१५ जानेवारी) हे प्रकरणी सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे.

“माझ्यावर आरोपपत्र दाखल केले असल्याची बातमी खरी असेल तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलिसांचे आभार मानतो. तब्बल तीन वर्षानंतर निवडणुका डोळ्यासोमर ठेवून माझ्यावर आरोपपत्र दाखल करणे, हा प्रकार राजकीय हेतून केला आहे. मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे”, असे कन्हैया कुमार यांनी म्हटले आहे.

तीन वर्षे तपास, चौकशी केल्यानंतर पोलिसांनी हे आरोपपत्र आणि एक ट्रंक भरून पुरावे कोर्टात सादर केले आहेत. आरोपपत्रात कन्हैया आणि अन्य आरोपींनी केलेल्या कथित १२ घोषणांचाही समावेश करण्यात आला आहे. ‘हम लेके रहेंगे आजादी…, संगबाजी वाली आजादी…, भारत तेरे टुकड़े होंगे…, कश्मीर की आजीदी तक जंग रहेगी…, भारक के मुल्क को एक झटका और दो…, भारत को एक रगड़ा और दो…, तुम कितने मकबूल मरोगे…, इंडियन आर्मी को दो रगड़ा..’ आदि घोषणा आरोपपत्रात नमूद करण्यात आल्या आहेत.

कन्हैयासह सय्यद उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य, आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली आणि खालिद बशीर भट यांच्या नावांचा आरोपपत्रात समावेश आहे. संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफझल गुरूच्या समर्थनार्थ एका कार्यक्रमाचं आयोजन जेएनयूमध्ये ९ फेब्रुवारी २०१६ला करण्यात आले होते.

या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्यवर आहे. या प्रकरणातील आरोपींची साक्ष सीआरपीसीच्या त्या कलमांतर्गत नोंद करण्यात आली आहे. साक्ष पलटल्यास त्यांना शिक्षा होऊ शकते. या व्यतिरिक्त फॉरेन्सिक आणि फेसबुक डेटाच्या माध्यमातूनही पुरावे गोळा करण्यात आले आहेत. भा. दं. वि. कलम १२४अ, ३२३, ४६५, १४३, १४९, १४७, १२० ब या कलमांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

 

Related posts

साध्वी प्रज्ञा यांची तब्येत आता ठीक असेल तर त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवा !

News Desk

राहुल गांधी आज घेणार काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक

News Desk

जनतेच्या मनातील आग व्यक्त करण्यासाठी निवडणूक लढवतोय !

News Desk