बंगळुरू | कर्नाटकात विधासभेच्या २२२ जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या. यात भाजप १०४, काँग्रेस ७८, जेडीएस ३८ आणि अन्य २ जागा मिळाल्या आहेत. भारतीच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच दक्षिणेत अडीच दिवसाचे का होईना पण, अखेर कर्नाटकात भाजपचा मुख्यमंत्री झाला. येडियुरप्पा यांनी विधानसभेत आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यामुळे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले आहेत.
मंगळवारी कर्नाटक विधानसभेचे निकाल जाहीर झाले होते. देशाच्या राजकीय इतिहासात दक्षिणेत पहिल्यांदाच भाजप मोठा पक्ष म्हणून समोर आला. भाजपने १०४ जागा मिळाल्यानंतर कर्नाटकाचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी बी. एस. येडियुरप्पा यांना काँग्रेस-जेडीएस यांच्याआधी सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. यानंतर कर्नाटकाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. कर्नाटकात राजकीय नाट्यमय घडामोडीला सुरुवात झाली.
भाजपचे बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हिंदी सिनेमाला देखील पाठी टाकेल इतका रोमहर्षक असे चित्र कर्नाटकाच्या राजकारणात गेल्या आठवडाभर घडत होते. कर्नाटकाच्या राजकीय नाट्यावर सिनेमा काढला तर, या सिनेमात भाजप हा विलन म्हणून दिसू येत होता. तर काँग्रेस हे अगदी प्रमाणिक हिरोप्रमाणे सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टाने शुक्रवारी भाजपला शनिवारी चार वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. कोर्टाने या विधानसभेतील बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण करण्याचे दिले.
बुहमत चाचणीच्या वेळी येडियुरप्पा यांनी आगदी भावनिक भाषण देऊन कार्नाटकाच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ‘भाजपाने मला कर्नाटकचे नेतृत्व करण्याची संधी दिल्यानंतर मी राज्यभरात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. जनतेचे प्रेम जिंकण्यात मी यशस्वी झालो. त्याबद्दल साडेसहा कोटी जनतेला नम्र वंदन करतो. आमच्या प्रयत्नांना जनतेने साथ दिली. या संपूर्ण लढ्यात ते पाठीशी उभे राहिले,’ असे येडियुरप्पा म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.