HW News Marathi
राजकारण

“कोणाचे बटण दाबायचे, हे बारामतीकरांना खूप चांगले माहिती”, अजित पवारांचा बावनकुळेंना टोला

मुंबई। “कोणाचे बटण दाबायचे, हे बारामतीकरांना खूप चांगले माहिती आहे”, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना लगावला. अजित पवार आज (९ सप्टेंबर) पुण्यात बोलताना बावनकुळेंवर निशाण साधला. भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपचा लक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीवर (Baramati) आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे हे या बारामतीच्या खासदार आहे. भाजपच्या नेते आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन येत्या काही दिवसात बारामतीचा दौरा करणार आहे, अशी माहिती  बावनकुळेंनी  दिली होती. भाजपने २०१९ मध्ये  A फॉर अमेठी जसे प्लॅन राबविला होता तसेच प्लॅन यंदा भाजप कढून B फॉर बारामतीचा नियोजन करण्यात येत असल्याचा भाजपच्या अनेक नेत्यांकडून  सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रीया दिली होती. फडणवीस म्हणाले होते, ” भाजपचा असे कुटला प्लॅन नाही जसे भाजपचा मिशन भारत होता तसेच बारामती महाराष्ट्र मध्ये येते  म्हणून हा मिशन बारामती नसून मिशन महाराष्ट्र आहे”, असे फडणवीस म्हणाले होते.

आता यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी  प्रतिक्रीया दिली आहे. अजित पवार म्हणाले, “आम्हाला काहीही वाटत नाही. असे खूपजण येतात. गेल्या 55 वर्षांत असे कितीतरी जण आले आणि कितीतरी जण गेले. खूप लाटा आलेल्या आणि गेलेल्या बारामतीकरांनी पाहिल्या आहेत. बारामतीकरांना खूप चांगले माहित आहे की, कुणाचे बटण कशा पद्धतीने दाबायचे. ते त्या निवडणुकीत त्यांचे काम चोखपणे बजावतील. याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.” अजित पवार पुढे म्हणाले, “बारामतीमध्ये माझे काम बोलते. त्यामुळे तुम्ही बारामतीची काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारे कुणी असेल, तर बारामतीकर त्याचा विचार करतील. मला प्रदेशाध्यक्षांना एक प्रश्न विचारायचे आहे की, तुम्ही एवढे संघटनेत काम करणारे, पक्षाच्या जवळचे होता, तर तुम्हाला, तुमच्या पत्नीला 2019 ला उमेदवारी का नाकारली? त्याचे उत्तर द्या. त्याचे उत्तर कुणी देऊ शकत नाही. अर्थात, हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. पण माझे मत आहे की कुणीही बारामतीत यावे. बारामतीकर सर्वांचे स्वागतच करतात. पण मतदानाच्या दिवशी कुणाला मतदान करायचे, कोणाचे बटण दाबायचे, हे बारामतीकरांना खूप चांगले माहिती आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी चंद्रशेखर बावनकुळेंना टोला लगावला.

Related posts

‘घड्याळ’ असलेल्या अनेक हातांनी मला मदत केली | सुरेश धस

News Desk

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर

Manasi Devkar

सीआरपीएफचे जवान नसते तर मी तिथून जिवंत बाहेर पडू शकलो नसतो !

News Desk