HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई | १७ व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशातील २० राज्यात ९१ मतदारसंघात आज (११ एप्रिल) मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे.  पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील विदर्भातील ६ जिल्ह्यातील ७ मतदारसंघामध्ये मतदान सुरू झाले आहे. यात  वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम अशा एकूण सात मतदारसंघांत मतदानाला सुरुवात झाली आहे.

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE

 • दुपारी ३ वाजेपर्यंत आंध्र प्रदेशमध्ये ५५%, अरुणाचल प्रदेशमध्ये ५०.८७% तर सिक्कीममध्ये ५५% मतदान पार पडले आहे.

 • दुपारी ३ वाजेपर्यंत वर्ध्यात ४३.९०%, रामटेकमध्ये ४४.५०%, नागपूरमध्ये ४१.२५%, भंडारा-गोंदिया ४९.०५%, गडचिरोलीमध्ये ५७.००%, चंद्रपूरमध्ये ४६.३०% तर यवतमाळ-वाशिममध्ये ४५.५३% इतके मतदान झाले आहे.

 • गडचिरोलीत मतदानावरुन परतताना ट्रॅक्टर ट्रॉलीला अपघात, 3 ठार 9 जखमी

 • नागपूरच्या धरमपेठ शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदानाचा हक्क बजावला आहे. मुख्यमंत्री पत्नी अमृता फडणवीस आणि आईसोबत मतदान केले आहे.
 • देशात मजबूत सरकार येण्यासाठी मतदान करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
 • सकळी ११ वाजेपर्यंत त्रिपूरा १ मतदारसंघ – २६.५ टक्के, पश्चिम बंगाल २ मतदारसंघ – ३८.०८ टक्के मतदान झाले आहे

 • गडचिरोलीमध्ये एटापटील मतदान केंद्रावर नक्षलवाद्यांनी आयडी स्फोट केला आहे. या स्फोटात कोणतीही प्रकराची जीवती हाणी झाली नाही

 • पहिल्या दोन तासात महाराष्ट्रातील चंद्रपूर – ५.३५ टक्के, रामटेक – ४.९ टक्के, नागपूर – ९.३३ टक्के, वर्धा -७.३२ टक्के, भंडारा-गोंदिया- ७.६१ टक्के, यवतमाळ-वाशिम – ६.३१ टक्के, गडचिरोली -७.३२ टक्के मतदान झाले आहे.
 • गोंदियात पुन्हा एकदा मतदानाचा खोळंबा, कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाल्याने मतदार खोळंबले
 • हैद्राबादमध्ये एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी  यांनी मतदान केले.

 • २०१४ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक मतधिक्याने यंदाची निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास गडकरी यांनी मतदान करताना व्यक्त केला आहे.
 • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला, गडकरी यांनी मतदान केंद्र २२० क्रंमाक जावून मतदान केले

 • मधुसुदन गुप्तान ईव्हीएम तोडली, आंध्र प्रदेशातील जनसेनाचे उमेदवार मधुसुदन गुप्तान यांनी ईव्हीएम तोडली. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

 • नागपूरमधून काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी आपल्या कुटुंबियांसोबत मतदानाचा  हक्क बजावला आहे
 • पहिल्या दोन तासात नागपूरमध्ये ८ ते ९ टक्के मतदान झाले आहे.

 • नागालंडमध्ये ९ वाजेपर्यंत २१ टक्के मतदान पार पडले आहे.

 • उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेन्द्र सिंह रावत यांनी देखील त्यांच्या कुटुंबियांसोबत मतदान केले

 • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत अमरावती येथे मतदानाचा हक्क बजावला आहे.

 • यवतमाळच्या ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे.
 • महाराष्ट्रातली गडचिरोलीमध्ये नागरीक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत.

 • जम्मू-काश्मीरमधील २ मतदारसंघासाठी मतदाना करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला आहे.

 • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातील २१६ क्रमांकाच्या मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

 • गोंदियामध्ये नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रात जावून मतदान केले

 • महाराष्ट्रातील नागपूरमध्ये मतदान केंद्र २२५ नागरिकांनी मतदान करण्यास सुरुवात

 • देशातील पहिल्यात टप्प्यातील आज मतदान सुरू होणार आहे. मी देशातील सर्व जनतेला लोकशाहीच्या उत्सवात सामील व्हावे. आणि अधिक-अधिक मतदान करा. पहिल्यांदा मतदान करा, नंतर जलपान करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

 • देशातील २० राज्यात ९१ मतदारसंघातील मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात

 

Related posts

लोकसभा निवडणूक मोदी-शहा विरुद्ध देश अशी आहे !

News Desk

जर पंतप्रधान तुमचा होणार असेल, तर मुख्यमंत्रीपद आम्हाला द्या !

News Desk

प्रियांका चतुर्वेदी यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड

News Desk