HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

राज्यात ७ जागांसाठी आज मतदान, दिग्गजांचे भवितव्य होणार सीलबंद

मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी आज  (११ एप्रिल)  देशभरात पहिल्या टप्प्यातील २० राज्यात ९१ मतदारासंघामध्ये मतदान होणार आहे.  पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भासह यवतमाळ लोकसभा मतदारसंघ मिळून ७ जागांवर मतदानाला सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे.  लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज (९ एप्रिल) थंडावणार आहे. पहिल्या टप्प्यात देशातील २० राज्याच्या ९१ जागांवर निवडणुकासाठी मतदान होणार आहे. देशात ७ टप्प्यात मतदान होणार असून २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस राहुल गांधी यांच्यासह राज्यातील दिग्गज नेत्यांनी विदर्भ प्रचारात पिंजून काढला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा प्रथमच वापर होणार  आहे. राज्यातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय हंसराज अहिर, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार सुरेश धानोरकर आदी दिग्गंजाचे भवितव्य ईव्हीएममध्ये सीलबंद होणार आहे.

विदर्भाच्या पूर्व भागात म्हणजेच नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा हे सहा जिल्हे मिळून लोकसभेचे नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि वर्धा असे सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. त्याचबरोबर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातही मतदान होत आहे.

Related posts

ही पहा…प्रियांका गांधींची ‘प्रियांका सेना’

News Desk

फक्त सत्ता आणि निवडणुकीचा विचार करण्यापेक्षा आधी दुष्काळाला पटकी द्या !

News Desk

KarnatakaByElection2018 : कर्नाटकात भाजपचा दारूण पराभव

News Desk