मुंबई | डॉ. सुजय विखे पाटील आज (१२ मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार केला आहे. सुजय हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आहेत. अहमदनगरमधून सुजयला काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविणार आहे.
Sujay Vikhe Patil:I've taken this decision against my father’s wishes. I don’t know how much my parents will support this decision, but I'll try my best to make my family proud by working under the guidance of BJP. CM & other BJP MLAs were supportive & helped me take the decision pic.twitter.com/7g0NGAAAnV
— ANI (@ANI) March 12, 2019
यावेळी सुजय यांनी म्हटले की, “वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन हा निर्णय घ्यावा लागला. संकटकाळी ज्यांनी मला साथ दिली मी त्यांच्यासोबत राहणार असून अहमदनगरमध्ये पक्षाच्या वाढीसाठी काम करणार असल्याचे यावेळी सुजय यांनी सांगितले. आमच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या घोषणा देण्यात सवयी होण्यास थोडा वेळे लागेल. त्यामुळे मी ‘भाजपचा विजय असो’,” अशा घोषणा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Maharashtra CM Devendra Fadnavis: Sujay Vikhe Patil's name has been forwarded by state unit to Central Parliamentary board for Lok Sabha candidature and we are sure that the recommended name will be accepted by the Central Parliamentary board. pic.twitter.com/NgROvUNmWj
— ANI (@ANI) March 12, 2019
“आम्ही सुजय यांचे नाव पक्षश्रेष्ठींकडे पाठविणार आहोत. आम्हाला खात्री आहे की, त्यांच्या नावावर शिक्कामोतर्ब होणार असून ते अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सुजय यांच्या पक्षप्रवेशा वेळी बोलत होते.” सुजय विखे-पाटलांच्या या पक्ष प्रवेशादरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे, बबनराव पाचपुते आदी नेते उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून सुजय यांच्या पक्ष प्रवेशावरून राजकारण सुरू होते. परंतु आज भाजपमध्ये प्रवेश केल्याने संपूर्ण चर्चेला पूर्णविराम लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (१२ मार्च) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल की, राष्ट्रवादीच्या जागेवर आमचा उमेदवार लढणार असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले होते. यानंतर सुजय यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कमोर्तब झाला होता. परंतु राधाकृष्ण विखे पाटील आता नेमके काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.