नवी दिल्ली | मध्य प्रदेश आणि मिझोरम या दोन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी आज(२८ नोव्हेंबर) मतदान झाली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे.
We’re 100% certain that BJP will form government with an absolute majority. We have set a target of 200 seats and our lakhs of volunteers are working to make it a reality: Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chauhan after casting his vote in Budhni #MadhyaPradeshElections pic.twitter.com/RNQMYXBFQs
— ANI (@ANI) November 28, 2018
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मतदान केले असून ते बुधनी मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. चौहान यांनी मतदान केल्यानंतर म्हणाले की, आम्हाला १०० टक्के विश्वास आहे की, भाजपा बहुमताने सरकार स्थापन करेल. आमचा २०० जागा जिंकण्याचा मानस आहे, यासाठी लाखों कार्यकर्ते काम करत आहेत.
Visuals from a polling station in Bhopal. Polling for 227 constituencies in the state will begin at 8 am, while voting for 3 constituencies has already begun. #MadhyaPradeshElections2018 pic.twitter.com/RnjsoctPbV
— ANI (@ANI) November 28, 2018
मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत २८९९ उमदेवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये २६४४ पुरुष, २५० महिला आणि ५ तृतीयपंथीयांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी मध्य प्रदेशात एकूण ५,०४,९५,२५१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात २,६३,०१,३०० पुरुष, २,४१,३०,३९० महिला आणि १३८९ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, बालाघाट जिल्ह्यातील तीन नक्षलप्रभावित विधानसभा मतदारसंघातील परसवाडा, बेहर आणि लांजी येथे सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत मतदान होणार आहे.
Voting underway for 230 assembly seats in #MadhyaPradeshElections, visuals from a polling booth in Indore pic.twitter.com/jxvUY9xVCl
— ANI (@ANI) November 28, 2018
दुसरीकडे, मिझोरमध्ये मिझोरमध्ये ४० जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये आठ राजकीय पक्षांचे एकूण २०९ उमेदवार मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी मिझोरममध्ये एकूण ७,७०,३९५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ३७४,४९६ पुरुष, ३,९४,८९७ महिला मतदारांचा समावेश आहे. मिझोरामध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत १५ टक्के मतदान झाले आहे.
15% voting recorded in Mizoram till 9 am #MizoramElections2018 pic.twitter.com/I14azMp4FU
— ANI (@ANI) November 28, 2018
Voting underway in Mizoram, visuals of people queuing up to vote at a polling station in Kanhmun #MizoramElections pic.twitter.com/VykFjNTYEm
— ANI (@ANI) November 28, 2018
Voting for 40 constituencies in Mizoram begins. Polling to conclude at 4 pm. #MizoramElections pic.twitter.com/7wHPcVQLsL
— ANI (@ANI) November 28, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.