HW News Marathi
राजकारण

…म्हणून ह्यांना एक प्रकारचा माज आलाय !

मुंबई | पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे हाहाकार माजला आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पदाधिकारी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हवाई पाहाणी आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन सेल्फी व्हिडिओवरून सडकून टीका केली आहे. “आज पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे परिस्थिती गंभीर आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि इतर मंत्री फक्त हवाई पाहणी करत आहेत. गिरीश महाजन तर सेल्फी घेत होते. आणि हे असे सगळे करू शकतात कारण त्यांना माहिती आहे की, ते निवडून येणारच आहेत. ह्यांना एक प्रकारचा माज आलाय,” अशा शब्दात राज ठकारेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.

महाजनांच्या सेल्फी व्हिडिओमध्ये ते पूर परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी जात असताना बोटीत बसले असून मोबाईलमध्ये बघत असून हासत हात दाखवित आहेत. या व्हिडिओमध्ये जे दिसते ते पाहता, महाजन पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले होते की पर्यटनासाठी ? असा प्रश्न पडतो. राज्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी जात असताना महाजन बोटी बसले असताना, त्यांच्या फोनमध्ये दंग असून कार्यकर्ता सेल्फी व्हिडिओ काढत असताना हासत हात दाखवित आहे. महाजनाच्या या कृत्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांना पूर परिस्थितीचा किती गांभीर्य आहे हे यातून दिसून येत आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिद्धू पाकिस्तानचे एजंट | हरसिमरत कौर

News Desk

“मातोश्रीचे दरवाजे उघडले, तर परत जाऊ”, संजय राठोड यांचे मोठे विधान

Aprna

राष्ट्रवादीचे महिला नेतृत्व आमच्याकडेच, आता त्यांच्याकडे काहीच उरले नाही !

News Desk