HW News Marathi
राजकारण

जानकर देणार पवारांना आव्हान, भाजपकडे करणार ६ जागांची मागणी

मुंबई | “महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा मला हिंद केसरी व्हायला जास्त आवडेल”, असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान दिले आहे. शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपण भाजपकडे ६ जागांची मागणी करणार असल्याचे देखील यावेळी जानकर यांनी म्हटले आहे.

“मी बारामती आणि माढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज केला आहे. बारामतीत यंदा कमळ फुलेल असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मात्र, पाच मिनिटांच्या मुलाखतीत हा मतदारसंघ मिळवू. मुख्यमंत्री आमचे म्हणणे ऐकतील अशी खात्री आहे”, असे जानकर यावेळी म्हणाले. यावेळी जानकरांनी भाजपकडे केलेली ६ जागांची मागणी भाजप मान्य होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महादेव जानकर यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळेंना आव्हान दिले होते. जानकर यांनी भाजपकडून निवडणूक लढवावी असा आग्रह त्यावेळी भाजपकडून होत होता. मात्र, त्यावेळी जानकर यांनी रासपमधून निवडणूक लढवली होती. जानकर यांनी त्यावेळी सुप्रिया सुळे यांना कडवी टक्कर दिली होती. मात्र, त्यावेळी सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या. आता महादेव जानकर शरद पवारांना आव्हान देण्यास तयार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बलात्कारी राज बल्लभ निर्दोष, शिक्षा हा यादवांचा अपमान, राबडी देवींचे अजब वक्तव्य

News Desk

मोदींची वागणूक पंतप्रधानपदाच्या नैतिकतेला साजेशी असायला हवी !

News Desk

मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबहिताकरिता सत्तेचा दुरुपयोग | सचिन सावंत

News Desk