HW News Marathi
राजकारण

तेलगीसह ७ आरोपींची स्टँप घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता

नाशिक | देशातील बहुचर्चित असा बनावट स्टँप घोटाळ्यातील प्रमुख आरोपी दिवंगत अब्दुल करीम तेलगीसह ७ आरोपींची आज (३१ डिसेंबर) जिल्हा व सत्र न्यायालयाने भक्कम पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीआयने ४९ जणांच्या साक्षी नोंदवल्या. २००३ साली सिबीआयने हा गुन्हा दाखल केला होता. नाशिक मधील प्रतिभुती मुद्रालणायातुन नादुरुस्त झालेले यंत्र अधिकार्‍यांना हाताशी धरुन खरेदी केले व त्याआधारे स्टँप छापून घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात त्याचे तुरूंगातच निधन झाल्यानंतर त्याच्यावरील सर्व आरोप मागे घेण्यात आले.

 

प्रतिभुती मुद्रणालयच्या जुन्या मशिन खरेदी

अब्दुल करीत तेलगी यांनी मुद्रणालयातील अधिकाऱ्यांनाही हाता मिळवणी केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाल्याने मुद्रणालय चर्चेत आले होते. प्रतिभुती मुद्रणालयाने काही जुन्या मशिनरी त्यावेळी विक्रीस काढल्या होत्या. देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंध असलेल्या मशिनरी विक्री करतांना त्या नेहमी सुट्या भागात विक्री केल्या जाव्यात असे अपेक्षित असते. तरी देखील तत्कालनी महाव्यवस्थापक गंगाप्रसाद यांनी संपुर्ण मशिनरी एकाच वेळी विक्रीस काढली व सदरची मशिनरी अब्दुल करीम तेलगी याने विकत घेतल्याचे त्यावेळी उघडकीस आले. गंगाप्रसाद यांच्यावरही तेलगीला मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता

तेलगीच्या न्यायालयात अनुपस्थितीसाठी आजाराचे कारण

अब्दुल करीम तेलगी याच्यावर देशभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर त्याला काही गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेच्या शिक्षाही सुनावण्यात आली. नाशिकमध्ये तेलगीसह सात आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र केंदीय अन्वेषण विभागाने नाशिकच्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आले. परंतु जो पर्यंत तेलगी न्यायालयात हजर होत नाही तो पर्यंत या खटल्याचे काम पुढे सरकणार नसल्याने सीबीआयने सांगितले होते. परंतु तेलगीने न्यायालयात न हजर राहण्यासाठी एड्स झाल्याचे कारण सांगून त्याला न्यायालयीन सुनावणीत गैरहजर राहण्याची अनुमती मिळावी. मात्र सरकारी वकीलने सीबीआयच्या पाठ पुराव्याने अखेर २०१३मध्ये अब्दुल करीत तेलगी यांच्या नावाचे वॉरंट जारी करण्यात आले. यानंतर पोलिसांनी बंदोबस्तात तेलगींना नाशिकच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भुजबळांच्या टोल्याला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

Gauri Tilekar

“2014 आणि 2019 मध्ये युती भाजपमुळेच तुटली, शिवसेनेमुळे नाही,” शेवाळेंच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

Aprna

ईशान्य मुंबईचे दोन्ही उमेदवार कोटक, संजय दीना पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

News Desk