HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री शिंदे-बोम्मईंची गुजरातमध्ये भेट; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पहिल्यांदा चर्चा

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) या दोघांमध्ये गुजरातच्या अहमदाबाद विमानतळाच्या (Ahmedabad Airport) लाऊंजमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. गुजरात (Gujarat) मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळा आज (12 डिसेंबर) पार पडला. या सोहळ्यादरम्यान दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट झाली. परंतु,  या कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची विमानतळाच्या लाऊंजमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे.

दरम्यान, भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. भूपेंद्र पटेल हे दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असून गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने 156 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या ऐतिहासिक विजयामुळे गुजरातमध्ये भाजपची पुन्हा एकदा सत्ता आली आहे.

Related posts

शिवसेनेने ‘मविआ’मधून बाहेर पडावे असे वाटत असेल तर…!

Aprna

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ११ नोव्हेंबरला चक्काजामचा इशारा

Gauri Tilekar

युतीबाबत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिला हा इशारा

Gauri Tilekar