मुंबई | राज्यात महाविकासाआघाडीचे नेते म्हणून आज (२८ नोव्हेंबर) अवघ्या काही तासांत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान होतील. थोड्याच वेळात मुंबईतील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर नुकतीच महाविकासाआघाडीच्या नेत्यांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या महाविकासाआघाडीने तयार केलेल्या किमान समान कार्यक्रमाबाबत या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली.
Eknath Shinde, Shiv Sena at press conference of 'Maha Vikas Aghadi' (NCP-Congress-Shiv Sena alliance): In Maharashtra, farmers are facing problems. This government will do best for farmers. This will be a strong govt. pic.twitter.com/GgJYJpR2LP
— ANI (@ANI) November 28, 2019
महाविकासाआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद
- तिन्ही पक्षांनी दिली महाविकासाआघाडीच्या किमान समान कार्यक्रमाची माहिती
- विचारधारा वेगळ्या असूनही सामान्य माणसांसाठी एकत्र
- हे शेतकरी आणि सर्वसामान्यांचे सरकार आहे.
- महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम तयार
- महाविकासाआघाडीच्या प्रत्येक निर्णयात भारतीय संविधानाचे मूल्य आणि तत्त्व केंद्रस्थानी असेल
- शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देणार, पीकविमा सेवा देणार
- कृषीमालाच्या योग्य भाव मिळवून देणार
- ८०% स्थानिकांना रोजगार मिळवून देणार
- मुलींना मोफत शिक्षण, महिलांना सुरक्षा
- राज्याला स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न
- तालुका पातळीवर १ रुपयात आरोग्य चाचणी
- सर्व जिल्ह्यात सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटल्स
- पूरग्रस्त, अवकाळी पाऊस नुकसानग्रस्तांना मदत
- हे सरकार समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाऊन.
- शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन हे सरकार काम करणार
- संविधानातील धर्मनिरपेक्षता या मूल्यावर काम करू.
- धर्माच्या नावावर भेदभाव केला जाणार नाही.
- शेतकरी कर्जमाफी, बुलेट ट्रेनवर सरकार स्थापन झाल्यावर निर्णय
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.