HW News Marathi
राजकारण

कर्नाटकच्या  विकासासाठी काँग्रेसला विजयी करा

बेळगाव | भाजपकडे कर्नाटकच्या विकासाच्या दृष्टीने कोणतेही ठोस धोरण नसल्याचे सांगत सत्ता भाजपच्या हातात दिल्यास फक्त रेड्डी बंधूंचा विकास होईल, कर्नाटकच्या सर्वांगीण विकासासाठी कॉंग्रेसला विजयी करा असे आवाहन खासदार अशोक चव्हाण यांनी केले. कर्नाटकच्या प्रचार दौ-यावर आहेत. त्यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर, खानापूर मतदारसंघातील उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतल्या.

यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या कार्यपध्दतीमुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. ही लढाई लोकशाही विरूध्द हुकुमशाहीची लढाई आहे. भाजपला पराभूत करून लोकशाहीचे रक्षण करण्याची क्षमता फक्त काँग्रेस पक्षाकडेच आहे. जेडीएस आणि इतर पक्षांकडे नाही. जेडीएस ही भाजपची बी टीम असून जेडीएसला दिलेले मत म्हणजे भाजपला मत आहे.

सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने शेतक-यांना कर्जमाफी दिली, कोणीही उपाशीपोटी राहू नये म्हणून गरिबांना अल्पदरात भोजन देणारी इंदिरा कँटीन योजना सुरु केली, गरिब, दलित,अल्पसंख्यांक समाजासाठी विविध कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक वेगाने प्रगती करित असून कर्नाटकच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

 

Related posts

#LokSabhaElections2019 : रणजितसिंह नाईक निंबाळकर देखील भाजपच्या गोटात ?

News Desk

तब्बल 9 महिन्यानंतर राज्याच्या सत्तांतरवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संपली; निकालाची प्रतिक्षा

Aprna

निवडणुकांपूर्वी पुलवामासारखा आणखी एक हल्ला घडविला जाईल !

News Desk