HW News Marathi
राजकारण

मराठा समाजाच्या आरक्षणाचा अहवाल आज शासनाकडे होणार सादर

मुंबई | मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडून आज शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून सादर होणाऱ्या या अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. हा अहवाल प्रथम राज्य मागासवर्ग आयोगाकडून समाजकल्याण विभागाकडे पाठवला जाईल. पुढे समाजकल्याण विभागाकडून हा अहवाल विधी विभागाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर हा अहवाल न्यायालयापुढे सादर केला जाईल.

“मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यशासन नेहमीच सकारात्मक आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अजूनपर्यंत शासनाकडे आलेला नाही. पुढील पंधरा दिवसात राज्य मागासवर्ग आयोगाचा अर्ज शासनाकडे सादर होईल,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मुख्यमंत्री अकोल्यात एका बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत पवार-राहुल गांधींची बैठक सुरु, राष्ट्रवादी होणार काँग्रेसमध्ये विलीन ?

News Desk

राहुल कलाटे चिंचवड पोटनिवडणूक लढवणार; ‘मविआ’च्या प्रयत्नांना अपयश

Aprna

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले…

Aprna