HW News Marathi
राजकारण

अजित पवार घेणार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक 

पिंपरी । राष्ट्रवादीचे माजी आमदार, महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उद्या (सोमवारी १ ऑक्टोबर)ला प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिली.

आकुर्डीतील हॉटेल ग्रॅण्ड एक्‍झॉटिका येथे दुपारी दुपारी चार वाजताच्या सुमारास पवार बैठक घेणार आहेत. या बैठकीला शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांच्यासह सर्व आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणूक जवळ अाली असून पुढील रणनिती ठरविण्यासाठी आणि नगरसेवकांची मते जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे. पक्ष संघटनेबाबत पदाधिकाऱ्यांना पवार मार्गदर्शन करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज ठाकरे विरोधी गोटात सामिल होणार ?

swarit

“…सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील”, सामनातून बंड पुकारलेल्या आमदारांना इशारा

Aprna

घाम गाळून पिकवलेला कांदा ‘आत्मघातकी’ ठरत आहे !

News Desk
महाराष्ट्र

बेकायदा गर्भपात प्रकरणी रुग्णालयाचा परवाना रद्द

swarit

सांगली | बेकायदा गर्भपात प्रकरणात सहभागाची शक्यता असल्याच्या कारणावरून रविवारी अटक करण्यात आलेल्या डॉ. अविजित पोपटराव महाडिक याच्या विटा येथील महाडिक रुग्णालयाचा वैद्यकीय परवाना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. बी. साळुंखे यांनी रद्द केला. शुक्रवारी डॉ. साळुंखे यांच्या आदेशानुसार विटा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश लोखंडे व विटा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी संयुक्तरित्या महाडिक हॉस्पिटलचा परवाना रद्द केल्याने रुग्णालय पूर्णपणे बंद ठेवण्याची सूचना लेखी पत्राद्वारे केली आहे.

सांगली येथे बेकायदा गर्भपातप्रकरणी डॉ. चौगुले दाम्पत्यास पोलिसांनी गजाआड केल्यानंतर विटा येथील डॉ. अविजित महाडिक याचे नाव तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्यासह पोलीस पथकाने शनिवारी रात्री उशिरा विटा येथील महाडिक हॉस्पिटलवर छापा टाकला होता. त्यावेळी पोलिसांनी आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतली होती. रविवारी डॉ. अविजित महाडिक यास अटक केली. या प्रकरणात डॉ. महाडिक यास अटक केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साळुंखे यांनी विटा येथील महाडिक हॉस्पिटलला १९४९ च्या बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्टच्या कलम ५ अन्वये देण्यात आलेला नोंदणी क्र. व्ही-४७९ हा वैद्यकीय परवाना रद्द केला.

त्याबाबतचा आदेश ग्रामीण रूग्णालय व विटा नगरपरिषदेला पाठवून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ग्रामीण रूग्णालय व नगरपरिषदेने शुक्रवारी दिलेल्या संयुक्त पत्राद्वारे डॉ. महाडिक यास रुग्णालयाचा मूळ परवाना वैद्यकीय अधीक्षकांकडे जमा करून, पुढील आदेश होईपर्यंत रुग्णालय बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या.

Related posts

ऐनवेळी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या मनोज कोतकरांना भाजपकडून नोटीस

News Desk

कोल्हापूर, सोलापूर, जळगावकरांसाठीही लवकरच विमानसेवा!

News Desk

खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

News Desk