HW News Marathi
राजकारण

मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडियासह जीएसएसटींचे काय झाले याबद्दल मोदी बोलण्यास तयार नाही !

मुंबई | मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडियासह जीएसएसटींचे काय झाले याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्यास तयार नाही, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहासह अभिनेता अक्षय कुमार यांनी काल (२४ एप्रलि) मोदींची घेतल्या मुलाखतीवरील प्रश्नांवर राज ठाकरेंनी आज (२५ एप्रिल) पनवेल येथील पार पडलेल्या जाहीर सभेत घणाघाती हल्ला केला आहे.

गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारयात्रेत तुफान गर्दी होत आहे, असा दावा भाजपच्या आयटी सेलने केला, पण जेव्हा त्या सत्यतेचा शोध एका वृत्तवाहिनीने घेतला त्यावेळेस लक्षात आलं की भाजपच्या आयटीसेलने अटलजींच्या अंत्ययात्रेतील फुटेज आणि फोटो वापरले, यावर भाजप का बोलत नाही, अशी थेट विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

विजय मल्ल्यानी ९००० कोटी रुपयांचे बँकांच कर्ज थकवले होते, पण विजय मल्ल्या हे पैसे भरायला तयार होते पण त्यांना संधी का दिली नाही? आणि १ लाख २० हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून देखील त्याला राफेलची विमान बनवायची संधी कशी दिली? कुठला अनुभव होता अनिल अंबानीना?

सत्ते येण्यापूर्वी वर्षाला २ कोटी लोकांना रोजगार मोदी देणार होते त्याचे काय झाले? मेक इन इंडियाचे काय झाले? स्टार्ट अप इंडियाचे काय झाले?नोटबंदी कोणालाही विश्वासात न घेता का लादली? ह्या नोटबंदीच्या रांगेत अनेक माणसे गेली, ४.५ ते ५ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ह्यावर मोदी कधी बोलणार?

 

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाची मुद्दे

  • नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांना राजकीय क्षितिजावरून हटवण्यासाठी, काळजावर दगड ठेवा कारण ही निवडणूक ह्या देशात हुकूमशाही येणार का लोकशाही टिकणार ह्यासाठीची आहे हे विसरू नका
  • कोणत्या योजना आणल्यात, त्याचा परिणाम नक्की काय जाणवतोय ह्याविषयी मोदी का नाही बोलत? जे प्रश्न मी आज विचारतोय तेच प्रश्न देश आज मोदींना विचारत आहे.
  • आणि मी विचारलेल्या प्रश्नावर भारतीय जनता पक्ष उत्तर द्यायला तयार नाही
  • अक्षय कुमार यांनी विचारलेला प्रश्न की, मोदी तुम्ही आंबा घाता का? मग कसा घाता, कापून खाता का?, की चोखून खाता ऐवढे मोठे प्रश्न विचाले
  • अभिनेता अक्षय कुमार यांनी काल (२४ एप्रिल) यांनी मोदींची घेतलेली अराजकीय मुलाखतीवर टीका केली
  • देशातील दोन मोठ्या सीबीआय आणि
  • भाजपने सर्व यंत्रणांची मुस्कट ताबी केली.
  • सेना-भाजप यांच्या आधी भांडले, नंतर त्यांनी युतील केली, भाजप- सेना सत्तेसाठी लाचार
  • मोदींनी दिलेले आश्वासन पाळले नाही, मोदींनी देशाला स्वप्न दाखवून फसविले
  • या देशांनी तुम्हाला भरभरुन मतदान केले, मग तुम्ही काय दिले, देशाला अंधारात ढकलले,
  • तुमचे आयुष्य मुर्ख बनण्यासाठी झाले का?,निवडणुकीच्या वेळी ते तुमच्या समोर येणार, तुम्ही त्यांना मतदान करणार, मग तुमच्या हाती येणार तीर काय?
  • महाराष्ट्रात १५ कोटी झाले लावण्याची थाप राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी मारली.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसविलेले, त्यांना खोटे बोलण्यास
  • सत्तेत आल्यानंतर प्रत्येक खासदारांनी एक एक गाव दत्तक घ्यावे, ही योजना फसली
  • मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, जीएसएसटी आणि नोटाबंदी यांचे काय झाले याबदद्ल मोदी बोलायला तयार नाहीत, एकही काम होत नाही.
  • काँग्रेसच्या काळातील योजनांची नावं बदलून नरेंद्र मोदींनी त्याच योजना पुन्हा घोषित केल्या. आणि ह्या योजना यशस्वीपणे राबवण्याऐवजी त्यांच्या जाहिरातींवर ४.५ ते ५ हजार कोटी रुपये खर्च केले
  • पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी एक पुरस्कार घ्यायला कोरियाला गेले.
  • आरबीआय च्या फंडाला हात घालायची जर सरकारवर वेळ येत असेल तर मोदी पुलवामा हल्ल्यानंतर कशाच्या जीवावर युद्ध करायला निघाले होते?
  • भाजपचे आयटी सेलवाले खोटे आकडे सांगून देशाला फसविण्याचे काम करतात
  • हवाई दलाच्या प्रमुखांनी सांगितले की, मृतांचा आकडा मला माहित नाही
  • बालाकोट एअरस्ट्राईक मध्ये किती माणसे मारली गेली ह्याचा तपशील आमच्याकडे नाही असे हवाईदल प्रमुख सांगत असताना, २५० माणसे मारली गेली हा दावा अमित शहe कुठून करत होते.
  • एअर स्ट्राईकनंतर मृतांची आकडेवारी अमित शहा यांना कशी माहिती?
  • मग अमित शाह ह्यांनी २५० माणसे मारली हा आकडा कुठून पैदा केला?
  • नवख्या अनिल अंबानींना राफेल खरेदींचे कंत्राट का दिले ?
  • मोदींच्या काळात बँकांची कर्ज बुडवून जाणाऱ्यांची संख्या जास्त
  • विजय माल्ल्या, ९ हजार कोटी, विक्रम कोटारी ८ कोटी,
  • पण विजय मल्ल्या हे पैसे भरायला तयार होते पण त्यांना संधी का दिली नाही? आणि १ लाख २० हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवून देखील त्याला राफेलची विमान बनवायची संधी कशी दिली? कुठला अनुभव होता अनिल अंबानीना?
  • नीरव मोदी यांनी १५ हजार कोटी रुपयाचा चुना लावून फरार होऊन, लंडनला गेला. त्यांच्या सीबीआयचे ऐवढ्या केसेसे असून देखील तो परदेशात गेलाच कसा ?
  • नोटाबंदीच्या काळात असे अनेक लोक बँकेतील पैसे चोरून फरार झाले. त्यांची यादी मी तुम्हाला दाखवितो
  • या नोटाबंदीमुळे देशातील उद्योगधंदे रसातळाला गेले.
  • भाजपचे दिल्लीचे मुख्यालय हे एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखे असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे
  • देशभरात पाच राज्यात निवडणूक झाल्या, यात खर्च करण्यासाठी भाजपकडे ऐवढे पैसे आले तर कुठून असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला
  • याचा शोध एक वृत्तवाहिनी घेतल्यानंतर सत्यसमोर आले
  • माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेचे शूटिंग दाखवून, मोदींच्या मागे गर्दी दाखविली
  • गुजरातमध्ये मोदींच्या प्रचारयात्रेत तुफान गर्दी होत आहे असा दावा भाजपच्या आयटी सेलने केला आहे.
  • देशाच्या इतिहासात दोन आरबीयाच्या गव्हर्नरने राजीनामे दिले
  • सर्व दिग्गज नेत्यांनी सांगितले की, नोट बंदी फसली.
  • नोटाबंदीच्या काळात साधारण साडेचार ते पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या
  • सर्व एटीएम बंद बडली, सर्व लोक रांगेत उभेर राहील, काही लोक रांगेत उभे राहून गेली.
  • अर्थमंत्री, आरबीआय आणि मंत्रमंडळांना विश्वासात न घेता मोदींनी नोटा बंदी केली,
  • हरिसाल गाव डिजिटल केल्याचा थापा मारल्या, परंतु ते खोटे असल्याचे पितळ राज ठाकरेंनी उघडे पडले
  • कॅशलेश गाव म्हणून वसईच्या भाजपने डोंगारा पिटला, परंतु प्रत्येक्षात तेथे रोख व्यवहार चालतो
  • देशाच्या हितासाठी, भविष्यासाठी पाहिजे,
  • हुमत असताना ही मोदींनी देशाची वाट लावली, सगळा कारभार अंधारात
  • गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी जेंव्हा निवडणुकीचा फॉर्म भरला, त्यावेळेला किती गर्दी जमली होती हे दाखवण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा खोटे फोटो वापरले
  • प्रचंड बहुमत घेऊन सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांना खोटे बोलायची का वेळ येते?
  • बरे माझ्या पक्षावर टीका केल्याने मला काही फरक पडणार नाही पण सत्ताधाऱ्यांना नक्की पडणार
  • ही लोकसभा निवडणूक विलक्षण आहे, जो पक्ष निवडणूक लढवत नाहीये त्या पक्षावर सत्ताधाऱ्यांकडून होत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा निकालानंतर बंडखोर, अपक्ष उमेदवारांना मोठे महत्त्व प्राप्त

News Desk

सीबीआय हे जणू भाजप सरकारचे कुत्रे !

News Desk

माझा नवरा मुस्लीम आहे तर मी एक अभिमानी हिंदू !

News Desk