नवी दिल्ली | पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीत गेल्या १५ दिवसांपासून दररोज वाढ होत असताना मोदी सरकारने बुधवारी केवळ 1 पैशांनी दरात सुट दिली आहे. केवळ १ पैशांनी पेट्रोल स्वस्त करुन सरकारने जनतेची क्रूर थट्टा असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीय. ट्विटर हॅंडलवरुन राहुल गांधी यांनी मोदींना टिकेचे लक्ष केले आहे .
Dear PM,
You've cut the price of Petrol and Diesel today by 1 paisa. ONE paisa!??
If this is your idea of a prank, it’s childish and in poor taste.
P.S. A ONE paisa cut is not a suitable response to the #FuelChallenge I threw you last week. https://t.co/u7xzbUUjDS
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 30, 2018
महागाई गगनाला भिडली आहे. अशा परिस्थितीत दर कमी करण्याची ही तुमची पद्धत आहे का? असे असेल तर ते अतिशय बालिशपणाचे आणि जनतेची क्रूर थट्टा करणारे आहे. मागच्या आठवड्यात मी तुम्हाला तेलाचे दर कमी करण्याचे चॅलेंज दिले होते. 1 पैशांनी दर कमी करून तुम्ही ते आव्हान अजुन स्वीकारलेले नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.राहुल गांधींनी या आधीही इंधनदरवाढी संदर्भात ट्विटरवरुन मोदींवर टिका केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.