HW News Marathi
राजकारण

मोहम्मद शमी यांची पत्नी हसीन जहाँ यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई | भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज मोहम्मद शमी यांची पत्नी हसीन जहाँ यांनी आता राजकारणात प्रवेश केला आहे. हसीन जहाँ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काही महिन्यांपूर्वी गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वादामुळे मोठी खळबळ माजली होती. हसीन जहाँ यांनी पती मोहम्मद शमीवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यावेळी हसीन जहाँ यांच्या या आरोपांमुळे चर्चांना मोठे उधाण आले होते. हसीन यांनी मुंबई काँग्रेस प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

हसीन जहाँ यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे आता उलटसुलट चर्चांना उधाण येणार आहे. हसीन यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हसीन जहाँ यांनी मोहम्मद शमीवर विवाह बाह्य संबध असल्याचा आरोप देखील केला होता. यासोबतच त्यांच्यावर मॅच फिक्सिंगचाही आरोप केल्यामुळे शमीला चौकशीला सामोरे जावे लागले होते. बीसीसीआय आणि उत्तर प्रदेश पोलिसांकडून शमी यांची चौकशीही चौकशी करण्यात आली होती. बीसीसीआयच्या चौकशीत मात्र त्यांना क्लिन चीट मिळाली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रपतीपदासाठी आज मतदानाला सुरुवात; द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात कोण मारणार बाजी

Aprna

ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना भाजपकडून उमेदवारी, सोमय्यांना मोठा धक्का

News Desk

पुलवामा हल्ला हा निवडणुकांसाठी मोदींनी केलेला पूर्वनियोजित कट !

News Desk
मनोरंजन

#मीटू : पेंटर जतिन दास यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप

Gauri Tilekar

मुंबई| ‘मीटू’ या मोहिमतून अनेक महिला त्यांच्यावरील होणाऱ्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवत आहेत. या मोहिमेद्वारे विविध क्षेत्रातील महिलांवर त्यांच्यावरील झालेल्या लैंगिक शोषणाचे कथन करत आहे. या मोहिमेत दिवसेंदिवस मोठमोठ्या व्यक्तींची नावेसमोर येत आहेत. या मोहिमेत सर्वात जास्त बॉलीवूड इंडस्ट्रीमधील कलाकार, दिग्दर्शक, अमिनेत्री यांची नावेसमोर येत आहेत. यात अजून एका व्यक्तीसमोर आले ते म्हणजे अभिनेत्री आणि फिल्ममेकर नंदिता दास यांच्या नंदिता यांच्या वडीलांवरही लैंगिक शोषणाचा आरोप करण्‍यात आला आहे. बोरा यांनी आपल्या ट्विटद्वारा पेंटर जतिन दास यांच्यावर आरोप केला आहे.

 

‘ १४ वर्ष आधी २००४ मध्ये माझ्या सासऱ्यांच्या ओळखीने दिल्ली झालेल्या एका इव्हेंटमध्ये जतिन दाससोबत ओळख झाली. त्यांनी मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली. मी त्यांची मोठी फॅन असल्याने मला खूप आनंद झाला काम परंतु त्यांनी मला जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता, असे ट्विट बोरा हिने तिच्यावरील झाला अत्याचार जगासमोर आणला.

Related posts

विंकवर 2018 मध्ये लोकप्रिय ठरलेल्या मराठी गाण्यांची यादी जाहीर

News Desk

विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड…

Manasi Devkar

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला ईडीचा समन्स

News Desk