HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मुंबईतील उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग आजपासून सुरू

मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातील उमेदवारांनी अर्ज भरला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील ३० मुंबई दक्षिण-मध्य आणि ३१ मुंबई दक्षिण या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल आज (२ एप्रिल) करण्यास सुरुवात केला होता.

या उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवारी (९ एप्रिल) असून या अर्जांची छाननी बुधवारी (१० एप्रिल) होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख १२ एप्रिल २०१९ आहे. मुंबई शहर जिल्ह्यासाठी ५२७ ठिकाणी दोन हजार ६०१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. धारावीसारख्या दाट लोकसंख्या असलेल्या ठिकाणी एका शाळेत जास्तीत जास्त ५८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे जोंधळे यांनी सांगितले.

 

 

Related posts

विधान परिषदेसाठी दराडेंना निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील

News Desk

दारुच्या प्रतिकात्मक बाटल्यांवर मुख्यमंत्र्यांचा फोटो

News Desk

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय चिटणीसपदाची जबाबदारी आमदार हेमंत टकलेंवर

News Desk