HW News Marathi
राजकारण

काँग्रेसच्या सहा उमेदवारांची नावे निश्चित

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांना आता काहीच दिवस शिल्लक आहेत. लवकरच या निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर होतील. त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने देखील मंगळवारी (३० जानेवारी) आपल्या सहा मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. काँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठकीत नांदेड, सोलापूर, यवतमाळ, वर्धा, धुळे आणि दक्षिण मुंबई या सहा मतदारसंघातील उमेदवाराची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

काँग्रेस संसदीय मंडळाच्या या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण, सोलापुरातून सुशिलकुमार शिंदे, यवतमाळमधून माणिकराव ठाकरे, वर्ध्यातून चारूलता टोकस, धुळ्यातून रोहिदास पाटील आणि दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. तर उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई मतदारसंघाबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

काँग्रेसच्या या बैठकीला माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव पाटील निलंगेकर, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, विलास मुत्तेमवार, संजय निरूपम इ. उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारच्या हस्तक्षेपामुळे सुब्रम्हण्यम स्वामी नाराज

Gauri Tilekar

RamMandir : …म्हणून आज रात्रीच सर्व शिवसैनिक महाराष्ट्रात परतणार

News Desk

राहुल गांधींनी घेतली दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांची भेट

News Desk