HW News Marathi
राजकारण

शरद पवार हे जाणता राजा आहेत, यात चुक काय?” छगन भुजबळांचे वक्तव्य

मुंबई | “शरद पवार हे जाणता राजा आहेत, यात चुक काय?”, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकारांशी बोलतना केले आहे. भुजबळांनी आज (5 जानेवारी) नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केले आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, स्वराज्यरक्षक होते, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात केले होते. अजित पवारांच्या विधानाविरोधात भाजपने राज्यभरात अजित आंदोलन सुरू आहेत. अजित पवारांनी कादगपत्रे सादर करत आपल्या विधानावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळांनी शरद पवार हे जाणता राजा आहेत, यात चुकीचे काय?, असे विधान केले. यावेळी बिरुदावरही मला मान्य आहे, असेही भुजबळांनी स्पष्ट केले आहे.

जाणता राजा ही जी पदवी शरद पवार यांना दिली जाती हे तुम्हाला मान्य आहे का?, असा सवाल पत्रकारांनी छगन भुजबळ केल्यावर ते म्हणाले, “शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्याला माझे समर्थन आहे. कारण, जो राज्यकर्ता असतो, त्याला पूर्वीच्या भाषेत राजाच म्हणत होते. आणि हा राजकारणातून चार वेळा मुख्यमंत्री झालेले किंवा देशभरामध्ये इतर झालेले. त्यांनी जे गोरगरिबांचे जे प्रश्न सोडविलेले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले. पुणे, नाशिक, मुंबईमधील 80 टक्के ओटोमोबाईलचे कारखाने शरद पवार यांनी आणले.”

जाणता राजा, त्यात चुक काय?

“शरद पवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव सरकार गेले तरी बेहदर. पण, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिलेच पाहिजे, हा निर्णय शरद पवार यांनी घेतला. यालाच जाणता राजा म्हणतात. जाणता राजा काय असते. जो आपल्या जनतेबरोबर त्यांच्या प्रश्नामध्ये एक रुप होऊन, ते प्रश्न प्रामाणिकपणे सोडवितो. तो जाणता राजा, त्यात चुक काय?”, असे भुजबळ म्हणाले.

 

 

Related posts

आता तरी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडणार का ?

News Desk

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मंगलप्रभात लोढांना स्थान; BMC निवडणुकीच्या दृष्टीने मोठे पाऊल

Aprna

#LokSabhaElections2019 : आमच्या लोकशाहीची तीच खासीयत आहे!

News Desk