HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

शिवसेना प्रवेशासंदर्भात पवारांनी घेतली भुजबळांची भेट

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे पक्ष सोडून शिवसेनेत पुन्हा एकदा स्वगृही परतणार अशा चर्चांना गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे. भुजबळ यांनी शिवसेना प्रवेश केला तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना भेटीसाठी बोलावले आहे. त्यामुळे या दोघांची भेट नेमके काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी-काँग्रेसमधून लोंढेच्या लोंढेच पक्षांतर करत आहेत. अनेक नेत्यांनी आतापर्यंत भाजप व शिवसेनेत प्रवेश केला. यासाठी भुजबळांची मनधरणी करण्यासाठी पवारांनी भुजबळांना भेटसाठी बोलावले असल्याचे म्हटले जाते. दरम्यानदोन दशकांपूर्वी शिवसेना सोडून आलेले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते छगन भूजबळ यांच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चा असल्याचे उधाण आले आहे.

कॉंग्रेसच्या निर्मला गावित आणि राष्ट्रवादी काँगेसच्या रश्मी बागल यांनी आज (२१ ऑगस्ट) मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी  “वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळेल”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाविषयीची दाट शक्यता वर्तवली जाते.

 

Related posts

महाराष्ट्रात कोरोनाबाधितंचा आकडा ८९ वर

rasika shinde

सभेतील कमी गर्दीने मोदींचा तापलेला माथा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली !

News Desk

लोकशाहीचे हे जिवंत रूप मानायचे की बेबंद लोकशाहीचे?

News Desk