HW News Marathi
राजकारण

कर्जत-जामखेडमध्ये भाजपचा राम शिल्लक राहणार नाही !

कर्जत-जामखेड | आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेते पक्षाची साथ सोडून भाजप-शिवसेनेत गेल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील प्रचाराची सर्व सूत्र आपल्या हातात घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार हे स्वतः दौऱ्यांसाठी, आपल्या पक्षांच्या उमेदवारांसाठी राज्यभर फिरून प्रचारसभांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपला पक्ष बळकट करण्याच्या, पक्षाचे स्वतंत्र अस्तित्त्व टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. याच पार्श्वभूमीवर, शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) बहुचर्चित अशा साताऱ्यातील प्रचारसभेनंतर आज (१९ ऑक्टोबर) शरद पवार आपले नातू आणि कर्जत-जामखेडचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचाराकरिता दाखल झाले. यावेळी केलेल्या भाषणात आणि त्यानंतर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शरद पवारांनी भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

काय आहे शरद पवार यांची फेसबुक पोस्ट ?

कर्जत-जामखेड येथील सभेला मिळालेला जनतेचा प्रतिसाद पाहता ही निवडणूक झाली की, २४ तारखेला निकाल लागताच, कर्जत-जामखेडमध्ये भाजपाचा राम शिल्लक राहिला नाही, ही हेडलाईन राज्यातील तमाम वर्तमानपत्रांची असेल.

महाराष्ट्रात सध्या कर्जत-जामखेडचीच चर्चा सुरु आहे. इथल्या तरुणाने भाजपाची झोप उडवली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री तीन-तीन सभा कर्जत-जामखेडमध्ये घेत आहेत.

५२ वर्षांपुर्वी आज रोहित ज्या वयात आहे त्या वयात मी विधानसभेला उभा होतो. बारामतीमध्ये त्यावेळी काही नव्हते. त्या गावाचा चेहरा बदलण्याची संधी मिळाली. परिवर्तन झालं.

रोहितने कर्जत-जामखेडची गेली पाच वर्षे जबाबदारी घेतली आहे. या गावाची ओळख दुष्काळी भाग आहे. त्यावेळी दुष्काळ बघायला पंडीत नेहरु, इंदिरा गांधी आल्या होत्या. या तरुणाने याविभागाचा चेहरामोहरा कसा बदलला हे बघायला यापुढील दिवसात पंतप्रधान आल्याशिवाय राहणार नाहीत.

रोहित पाच वर्षांत अनेक विकासकामे, प्रकल्प या भागासाठी उभे करेल. बारामतीत विकास व्हायला २० वर्षे लागली परंतु रोहितला साथ लाभली तर तो कर्जत-जामखेडमध्ये ते पाच वर्षांत करुन दाखवेल, याची मला खात्री आहे. कर्जत- जामखेड ही वेगळी चीज आहे, हे देशाला कळू दे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२१ मे ला विधान परिषदेच्या ६ जागांसाठी होणार निवडणूक

News Desk

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना ‘या’ प्रकरणात मिळाला दिलासा

Aprna

गायरान जमीन प्रकरणी अब्दुल सत्तारांचा पदाचा दुरुपयोग; तात्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा! – अजित पवार

Aprna