HW News Marathi
राजकारण

शेलार, मुनगंटीवारांना योग्य पद न देण्यावरून धनंजय मुंडेंची सरकारविरोधात मिश्कील घोषणाबाजी

मुंबई | ‘आशिष शेलारला मंत्री न करणाऱ्या सरकारचा धिक्कार आसो,’ ‘सुधीर भाऊला चांगले सरकार न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, अशी मिश्कील घोषणाबाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर दिली आहे. धनंजय मुंडे यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांना घोषणेतून टोले लगावले. राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून (17 ऑगस्ट) सुरू झाले आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिले अधिवेशन आहे. या अधिवेशनात विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक झाले. या घोषणाबाजीत धनंजय मुंडे आघाडीवर होते.

विधीमंडळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री दाखल झाल्यावर विरोधकांनी ’50 खोके, एकदम ओक्के’, ‘आले रे आले गद्दार आले’, अशा घोषणाबाजी दिल्या आहेत. ‘ओला दुष्कार जाहीर न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘आशिष शेलारला मंत्री न करणाऱ्या सरकारचा धिक्कार आसो’ धिक्कार असो’, ‘आशिष शेलारला पुन्हा एका मुंबईचा अध्यक्ष करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘संजय शिरसाट सरकारचा धिक्कार असो’, ‘अरे ईडी सरकार हाय हाय’, ‘अरे ईडी सरकार हाय हाय’, ‘शेतकऱ्याला मदत न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो धिक्कार असो’, ‘सुधीर भाऊला चागले सरकार न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,” असा टोला सुधीर मुगंटीवार आणि आशिष शेलार यांना टोला लगावला.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात निष्ठावंतांना स्थान नाही! –  आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे म्हणाले, “सरकारने जे मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. यावरून खरा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळालेले आहे. दुसरे म्हणजे जे अपक्ष शिंदेंबरोबर गेलेले आहेत. त्या अपक्षांना मंत्रिमंडळात कुठेही स्थान मिळालेले नाही. जो खरा सत्ताधारी पक्ष आहे. जे गद्दार आहेत, त्यांच्यातील नाही. अनेक चांगल्या काम करणाऱ्या महिला आहे, अशा महिलांना मंत्रिमंडळात कुठेही स्थान मिळालेले नाही. मुंबईकरांना स्थान मिळालेले नाही. ना मुंबईचा आवाज ऐकला ना, महिलांचा आवाज ऐकला. ना अपक्षांचा कुठे तरी आवाज आहे. आपण खरे जर पाहिले तर जे पहिल्या 13-14 निष्ठवंत जे शिंदेबरोबर  गेले होते. त्या आमदारांना देखील मंत्रिमंडळात स्थान नाही.  म्हणजे शिंदे सरकारने पुन्हा एकदा दाखविले की, निष्ठावंतांना त्यांच्या मनात कुठेही स्थान नाही.”

संबंधित बातम्या

Related posts

भाजपने मित्रपक्षांना जागा ‘दाखवली’ म्हणजे ‘दिली’, उद्धव ठाकरेंचा टोला

News Desk

शरद पवारांच्या मते ‘हे’ ३ उमेदवार पंतप्रधान पदासाठी योग्य

News Desk

अयोध्या प्रकरणाची आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

swarit