HW News Marathi
राजकारण

“भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही”, शरद पवारांची खंत

मुंबई | “भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही”, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान शरद पवारांनी आज (8 जानेवारी) पत्रकार परिषद घेतली होती. यात शरद पवारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, राज्य सरकार, काँग्रेस खासदार राहुल गांधी आदी मुद्यांवर त्यांनी हल्लाबोल केला आहे.

शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्राची एक परंपरा आहे. या राज्यात लोकांनी अनेक चांगले राज्यपाल पाहिले आहेत. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखे अनेक नावं यात घेता येतील. अतिशय उच्च दर्जाचे व्यवहार असणारे लोक महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून मिळाले. महाराष्ट्रात जे जे राज्यपाल झाले त्यांनी पक्ष कोणताही असो, पण राज्याच्या हितासाठी मार्गदर्शन केले आणि घटना आबाधित ठेवली. हे पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्याबद्दल सतत चर्चा होते. त्यांच्यावर लोकांना सतत टीका करावी लागते. ते सतत चुकीची वक्तव्ये करतात. त्यामुळे जनतेला त्यांची नापसंती दाखवावी लागते. हे चांगलं नाही. शेवटी हे महत्त्वाचं पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, पण भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही.”
मविआ एकत्र निवडणूक लढण्यास फार अडचण येणार नाही
महाविकास आघाडी आगामी निवडणुकांसदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले, “आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढण्यास फार अडचण येणार नाही. २०२४ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट एकत्र तयारी करत आहोत. एकत्र निवडणुका लढण्याच्या रणनीतीवर सध्या चर्चा सुरु आहे, पण अजून अंतिम निर्णय झालेला नाही.”
सत्ता हातात असल्यावर जमिनीवर पाय ठेवून वागायचे
“सत्ता हातात असल्यावर जमिनीवर पाय ठेवून वागायचे असते”, असा टोला शरद पवार यांनी राज्य सरकारला लगावाल आहे.  पण मी आता बघतो की, सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांची विधान याला तुरुंगात टाकेल, यांचा जामीन रद्द करेल वगैरे वगैरे अशी भाषा करत आहेत. हे खरं राजकीय लोकांचे काम नाही. परंतु या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली आहे”, असा टोला शरद पवार यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

Related posts

आजपासून शरद पवार ३ दिवसांच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर

Gauri Tilekar

शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, आशिष शेलारांची बोचरी टीका

News Desk

भाजपकडे कोणती तरी वॉशिंग पावडर आहे म्हणूनच… !

Gauri Tilekar