HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“बेकायदेशीर शिंदे सरकारचे बेकायदेशीर प्रवक्त्याचे पवारांवरील वक्तव्य बेजबाबदारपणाचे”

मुंबई | दिपक केसरकर यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्याचं कारण शरद पवार आहेत, असं दिपक केसरकर यांनी म्हंटलं होतं. यावर आता राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. बेकायदेशीर शिंदे सरकारचे बेकायदेशीर प्रवक्ते दिपक केसरकर यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याची टीका करत त्याच भाषेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवार यांच्यावर दिपक केसरकर यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप केला असून या आरोपाला महेश तपासे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लोटांगण घालणाऱ्या बंडखोर आमदारांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वेदना देण्याची खरी कृती केली आहे तर शरद पवारांनी त्यांचा स्वाभिमान आणि मैत्री जपण्याचे काम केल्याचे महेश तपासे यांनी ठणकावून सांगितले आहे.

शिवसेनेचा इतिहास किंवा जे लोक बाहेर पडले त्याची कारणे दिपक केसरकर यांना माहीत नसावी असा टोला लगावतानाच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत होती याची आठवणही महेश तपासे यांनी दिपक केसरकर यांना करुन दिली आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला झिडकारले त्यावेळी पवारांनी शिवसेना – कॉंग्रेस – राष्ट्रवादी या तीन पक्षाची मोट बांधून महाविकास आघाडी तयार केली व शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले हे दिपक केसरकर सोयीस्करपणे विसरले आहेत, असेही महेश तपासे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रीय पातळीवर मनसेशी युतीबाबत चंद्रकांत पाटील काय म्हणतात ?

News Desk

राम शिंदेंच्या चौंडी गावात रोहित पवारांच्या पॅनलने मारली  बाजी

News Desk

विभिन्न योजनेतील कर्मचारी एक दिवसीय संपावर

News Desk