HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

बंगालमध्ये घडलेला हिंसाचार भाजपप्रेरित । जयंत पाटील

मुंबई | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मंगळवार (१४ मे) कोलकातामधील रोड शोदरम्यान मोठा हिंसाचार झाला होता. यानंतर देशभरातून या हल्याचा निषेध करण्यात येत आहे. तर भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यामध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. तर आता या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजवर टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाना साधला आहे. निवडणुका जिंकण्यासठी भाजपकडून दंगली घडवून आणल्या जातात हा आजपर्यंतचा इतिहास आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेला हिंसाचार हा भाजपप्रेरित आहे. हे अनेक पुराव्यांवरुन सिद्ध होत आहे, असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

जयंत पाटील यांनी ट्विट म्हटले की, “पराभव समोर दिसत असल्याने भाजप मुद्दाम आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण केली जात आहे. येत्या काळात जर भाजपने औपचारिक आणीबाणी जाहीर केली तर आश्चर्य वाटायला नको”, असेही पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पाटील पुढे असे देखील म्हणाले की, “निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा दंगली घडवते हा आजपर्यंतचा इतिहास आहे. पश्चिम बंगालमध्ये घडलेला हिंसाचार हा भाजपाप्रेरित असल्याचे वेगवेगळ्या पुराव्यांवरून स्पष्ट होते आहे. पंडित विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना भाजपा कार्यकर्त्यांनी केल्याचे व्हिडियोमध्ये स्पष्ट दिसत आहे.”

येत्या रविवारी (१९ मे) लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पश्चिम बंगालमध्येही या टप्प्यात मतदान होणार आहे. अशातच झालेल्या या हिंसाचाराला लक्षात घेता निवडणूक आयोगाकडून एक दिवस आधीच शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचाराबंदी आणण्यात आली आहे. प्रथेप्रमाणे निवडणुकांच्या ४८ तास आधी प्रचारावर बंदी आणली जाते मात्र यावेळी त्याआधीच म्हणजे १६ मेच्या रात्रीपासून प्रचार बंद करण्यात येणार आहे.

 

 

 

 

Related posts

हा नवा भारत कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन करणार नाही !

News Desk

विशेष कायदा करा, अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा !

News Desk

मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न युद्ध पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करू | संभाजी महाराज

News Desk