HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

…कि लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार ?, भाजपविरोधात राष्ट्रवादीची बॅनरबाजी

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे. “ज्यांना आम्ही नाकारले, हाकलले त्यांनाच तुम्ही स्वीकारले, गोंजारले. आपला पाळणा हलणार ? कि लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार ? बुरा ना मानो होली है”, असा बोचरा सवाल राष्ट्रवादीने आपल्या बॅनर्सद्वारे केला आहे. माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी (२० मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आणखी काही देखील नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हटले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने भाजपवर बॅनर्समधून निशाणा साधला आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या आधी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. सुजय यांच्या भाजपप्रवेशापासूनच रणजितसिंह देखील भाजपच्या काही अंशी संपर्कात होते, अशीही माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर “आपला पाळणा हलणार कि लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार ?”, असा सवाल राष्ट्रवादीने भाजपला केला आहे.

Related posts

आज युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार

News Desk

धुळ्याचे भाजप आमदार अनिल गोटेंनी स्थापन केला नवा पक्ष

News Desk

सुशीलकुमार शिंदेंची उमेदवारी निश्चित, राहुल गांधी लवकरच सोलापूर दौऱ्यावर

News Desk