HW Marathi
राजकारण

व्यंगचित्रातून राष्ट्रवादीची मोदींवर टीका, सगळ्यांना हातातले ‘टेडी बिअर’ बनवले !

मुंबई | सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू असून या  वीकमध्ये आज (१० फेब्रुवारी) दिवस ‘टेडी बिअर डे’  म्हणून तरुणाई साजरा करत आहे. परंतु या व्हॅलेंटाईन वीकपासून राजकीय पक्ष देखील मागे राहिले नाही. राष्ट्रवादी काँग्रसने मोदींच्या हातात ‘टेडी बिअर’ त्यावर मीडिया लिहले आहे. “मोदी तुम्ही हे काय केले?  सगळ्यांना हातालेले ‘टेडी बिअर’ बनवले,” असे व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विटर अकाऊंटवरुन हे व्यंगचित्र शेअर केले आहे

सीबीआय आणि आरबीआय सारख्या स्वायत्त संस्था असोत किंवा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाणारी प्रसारमाध्यमे. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत सर्वांनाच आपल्या बोटांवर नाचविण्याचा प्रयत्न केला,” असे कॅप्शन देऊन मोदी व्यंगचित्र ट्विटरवर मुंडेंनी ट्विट केले आहे. मोदींनी देशातील सर्वांना आपल्या हातातील बाहुले बनविले असल्याचे या व्यंगचित्रातून राष्ट्रवादीला सांगून त्यांच्यावर टीका केली आहे.

 

Related posts

जेव्हा उदयनराजे डंपर चालवतात…

News Desk

2019च्या निवडणुकांमध्ये मोदी ना इथले राहतील ना तिथले। माजिद मेनन

News Desk

जयाप्रदा रामपूरमधून आझम खानविरोधात निवडणूक लढणार

News Desk