HW Marathi
राजकारण

नेत्यांच्या आवडीचा विषय म्हणजे बदल्या !

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या सभेत घोषणा देणाऱ्या विदर्भवाद्यांना हकलून द्या, असे म्हणत वेगळ्या विदर्भाच्या घोषणा देणाऱ्यांवर ते चांगलेच रागावले होते. तर आता त्यांनी आपली बदली करुन घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना टोला हाणला आहे. सध्या आपली बदली करुन घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राजकीय नेत्यांना त्यांनी चांगलेच झापले आहे. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या सरपंच सत्त्कार सोहळ्याच्यावेळी गडकरी बोलत होते.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या नेत्यांना तर शिक्षकांच्या बदल्यांशिवाय दुसरे कामच नाही, असेही ते यावेळी म्हणाले. मात्र नेत्यांच्या अशा वागण्यामुळे दुर्दैवाने शिक्षणाचा दर्जा सुधारत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. ज्या शहरी शाळांचा निकाल १०० टक्के आहे. त्या नामांकित शाळांवर महापालिका आणि ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची जबाबदारी टाकावी, असा सल्ला सुद्धा गडकरींनी दिला आहे.

नितीन गडकरी यापूर्वीचीही विविध विधाने चांगलीच गाजली होती. जो आपले घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही, असेही एका कार्यक्रमात त्यांनी म्हटले होते. तर पोकळ स्वप्न दाखवणाऱ्यांना जनता झोडपून काढते. मी जे बोलतो ते करुन दाखवतो”, असा टोलाही त्यांनी नेत्यांना लगावला होता.

Related posts

उध्दव ठाकरे शिवनेरीच्या पवित्र मातीचा कलश अयोध्येला नेणार

News Desk

‘हिट’ मारल्यानंतर किती डास मेले ते मोजत बसू की, आरामात झोपू ?

News Desk

मी सर्वात जास्त जमीन खरेदी केली ही केवळ अफवा | राजू शेट्टी

News Desk