HW News Marathi
राजकारण

जे दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई होणार !

मुंबई | महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी कारवाईमध्ये कोणतेही राजकारण नाही. सरकारकडून कोणावरही सूडबुद्धीने कारवाई करण्यात आलेली नाही”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. “जे दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई होईल”, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. दरम्यान, आगामी विधानसभेच्या तोंडावर शरद पवार, अजित पवार यांच्यावर होणाऱ्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला काँग्रेसला मात्र मोठा धक्का बसला आहे.

“मुंबई उच्च न्यायलयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनुसार त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर यात कोणाची काय भूमिका होती ? हे स्पष्ट होईल. या प्रकरणात कोणत्याही पद्धतीने राज्य सरकार हस्तक्षेप करत नाही. १०० कोटींपेक्षा जास्त रकमेची आर्थिक तक्रार दाखल झाली कि ईडी त्या प्रकरणात हस्तक्षेप करते”, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील संचालक मंडळाने आणि कर्ज मंजुरी समितीने अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्यांचे संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांच्या ED कोठडीत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ

Aprna

 शरद पवारांच्या सभेला अखेर परवानगी

swarit

संयुक्त पत्रकार परिषदेत मी आणि उध्दव ठाकरे जे बोललो तेच अंतिम !

News Desk