HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

तुम्ही अनेक वर्षे दबावतंत्राचा वापर केला, परंतु रावणराज जास्तकाळ चालत नाही !

मुंबई | “पवारांची टीम आता संपली आहे. आता राज्यात आमचीच टीम काम करणार आहे. रावणराज जास्तकाळ चालत नाही, रामराज्य येतेच”, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कल्याणराव काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

“सोलापूर जिल्ह्यातील समाजकारणात असलेली सर्व मंडळी आमच्याशी जोडली गेली आहेत. तुम्ही अनेक वर्षे दबावतंत्राचा वापर केला. परंतु, रावणराज जास्तकाळ चालत नाही, रामराज्य येतेच. कल्याणराव तुमच्यावर कुणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर मला सांगा. मग मी त्याच काय करायचे ते बघतो”, असेही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा दिला आहे. “ज्या लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी स्वतःचा स्वार्थ नव्हे तर समाजाचा विचार केला. ओपनींग बॅटसमन म्हणून कॅप्टन मैदानात उतरले. पण, बॅट्समनच पळून गेला”, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Related posts

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणार, दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

News Desk

मार्चच्या पहिल्याच आठवड्यात लोकसभा निवडणुकाची घोषणा ?

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले

News Desk